- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जलाशयातुन व जलाशयालगतचे पाणी ज्या शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनाकरिता उपसा करावयाचे आहे, त्या शेतकऱ्यांनी याबाबत परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यांनी नियोजित पाणी वापर संस्था कार्यालये किंवा वैयक्तिक पाणी उपसा परवाना करिता दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज तसेच अर्जासोबत मूळ सातबारा उतारा सादर करावा. विहीत अर्जाचा नमुना उपविभागीय कार्यालयात उपलब्ध आहे.
दर्यापुर तालुक्यातील सामदा (सौं) लघु पाटबंधारे प्रकल्प या जलाशयालगतचे क्षेत्र ८ हे. मौजा- कासमपुर, क्षेत्र ११ हे. मौजा- सामदा, क्षेत्र ८ हे. मौजा-बाभळी, क्षेत्र १९ हे. मौजा- सांगळुद, जलाशयालगतच्या क्षेत्राचा समावेश आहे. अमरावती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी कळविले आहे.