वन्यजीव हत्याप्रकरणी तपास सुरू; शवविच्छेदनानंतर नमुने प्रयोगशाळांना पाठविले

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    * उपवनसंरक्षक दिव्य भारती यांची माहिती
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : सिपना वन्यजीव विभागांतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर परिक्षेत्रात पाच चौसिंगा व दोन भेकर अशा एकूण सात वन्यप्राण्यांची हत्या झाल्याचे निदर्शनास आल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास होत आहे. या प्राण्यांचे शवविच्छेदनानंतर नमुने तपासणीसाठी हैदराबाद व नागपूर येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आल्याची माहिती उपवनसरंक्षक दिव्य भारती यांनी दिली.

    उपवनसंरक्षक श्रीमती भारती, सहायक वनसंरक्षक के. एस. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एम. शेलार, वनपाल शेख इक्बाल आदींसमक्ष चिखलद-याचे पशुवैद्यकीय अधिकारी अनिल पुंड व त्यांच्या चमूने मृत सात वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन करुन दिले. शवविच्छेदनाचे, तसेच घटनास्थळी प्राप्त नमुने हैदराबादेतील शासकीय प्रयोगशाळा व नागपूरमधील गोरेवाडा आणि अमरावतीतील प्रादेशिक न्यायसहायक वैद्यकीय प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले आहेत. वनविभागातील अधिकारी व वनकर्मचारी यांनी या क्षेत्रामध्ये पायदळ गस्त घालून तपास केला. प्राथमिक माहितीनुसार संशयितांची चौकशी करून बयाण नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे, उपवनसंरक्षकांनी सांगितले.

    (छाया : संग्रहित)