• Fri. Jun 9th, 2023

वंश गायकवाड कडून वाढदिवसानिमित्त शाळेला भेटवस्तू प्रदान

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित, वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत शाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वृंद संस्थेचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व शालेय समिती अध्यक्षा डॉ. सौ. माधुरीताई चेंडके यांच्या मार्गदर्शनात शाळेत वैविध्यपूर्ण अभ्यासपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करतात. शाळेतील गुणवंत व प्रतिभाशाली विद्यार्थ्यांनाही संस्थेचे प्रधानसचिव वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन देतात. शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेअंतर्गत खेळाच्या विविध सोयी सुविधाही काळजीपूर्वक पुरवितात.

    नुकतेच इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेल्या वंश मनोज गायकवाड या विद्यार्थ्याने व त्याच्या कुटुंबीयांनी वंश च्या वाढदिवसानिमित्त शाळे प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला भेटवस्तू प्रदान केली. या भेटवस्तूचा स्वीकार शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार व वर्गशिक्षिका आसावरी सोवळे यांनी केला.

    मनोज व माधुरी गायकवाड हे दाम्पत्य आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याला व शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा सतत प्रयत्न करतात व आपल्या पाल्यास शाळेच्या प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी सुद्धा करतात. याकरिता मुख्याध्यापक यांनी शाळेच्या वतीने पालकांचे कौतुक व अभिनंदन केले.यावेळी दिलीप सदार, आसावरी सोवळे, अमोल पाचपोर, स्वरा व श्रवण पाचपोर, मनोज व माधुरी गायकवाड, मंदाताई गायकवाड, प्रभाताई गायकवाड, अलका गायकवाड, नंदकिशोर गायकवाड, प्रेम वाघमारे, दामोदर तांबे, चि.भावेश, वंश, तन्वी, आरोही इत्यादी सर्वांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *