• Fri. Jun 9th, 2023

रीमझीम रीमझीम पावसाच्या सरी

    रीमझीम रीमझीम पावसाच्या सरी
    नाचत गाजत येई, विजे वरी
    घेऊन मुठीत, धुळ वारा
    धावत येई भूईवरी ॥ ध्रृ ॥
    पावसाच्या सरीने एका
    दर्प पसरविला, वनामती वरी
    तुंबली गंगा, तुंबले सरोवर
    निर्झर धर्तीही थाटात नटली, तृप्त झाले धनी ॥ 1॥

    जरी कलंक लागला, वेदना, व्याधीच्या पुराचा
    तरीही समृध्दी आली घरी
    आता धवल झाले रे आकाश
    इंद्रधनुष्यही पर्वतापुडे, दंडवत करी ॥ 2 ॥
    पावसा विना, प्राण तळमळला जेव्हा जनाचा
    धावत मेघ आला, अंबरातून वर्षूनी
    आता नको रे पुन्हा विलंब, सरीच्या संरक्षणात.
    जीने वैकुंठ आनले, अवनी वरी ॥ 3 ॥
    -शैलेश हातबुडे

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *