• Sun. May 28th, 2023

‘रामेती’च्या प्रांगणातील वाळलेली सागवान झाडे विक्रीस; इच्छूकांनी निविदा भरण्याचे आवाहन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : तपोवन रस्त्यावरच्या ‘रामेती’च्या (प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था) प्रांगणातील वाळलेल्या 5 सागवान झाडांचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. इच्छूकांनी निविदा सादर करण्याचे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

    ‘रामेती’च्या प्रांगणातील वाळलेली 5 सागवान झाडे काढण्याबाबत महापालिकेची रीतसर परवानगी प्राप्त आहे. त्यानुसार लिलाव जाहीर करण्यात आला आहे. निविदा भरणा-यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, आठ हजार रू. चा डीडी आदी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. वृक्ष काढताना कोणतीही हानी होऊ न देण्याची व वाहतुकीची जबाबदारी कंत्राटदाराची असेल. इच्छूकांनी संस्थेशी (0721) 2952863 वर संपर्क साधावा.

    (छाया : संग्रहित)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *