राज्याभिषेक…

    शिव राज्याभिषेकाने
    गड किल्ले उजळले,
    पशू पक्षी झाडे वेली
    चराचर सुखावले,
    रायगडी सिंहासनी
    शिवराय विराजले !धृ!
    काय सांगू गड्या तूला
    जन सारे आनंदले,
    आनंदा ना पारावार
    काळे संकट टळले,
    रायगडी…१
    गनिमाला चिरडण्या
    शिव प्रभू राजे झाले,
    लेकीबाळी सानथोर
    फेर धरुन नाचले,
    रायगडी….२
    शेतकरी कष्टकरी
    वाटू साखर लागले,
    अन्यायाला निवारण्या
    न्याय प्रिय राजे झाले,
    रायगडी…..३
    शेतीवाडी गोरं ढोरं
    प्रेमभरे शहारले,
    चारापाणी बी बियाणे
    विनासायस लाभले,
    रायगडी….४
    सैन्य अठरापगडी
    सारे प्रेमाणं जपले,
    सुख दुःख ही तयांचे
    सदा मानले आपले,
    रायगडी….५
    देवालये नि मशीदी
    धन देऊन जपले,
    सर्वधर्म समभाव
    तत्व सदा स्वीकारले,
    रायगडी…..६
    सारे उदीम व्यापारी
    मनोमन सुखावले,
    संरक्षण मावळ्यांचे
    बहुप्रेमाणं लाभले,
    रायगडी….७
    दूर दृष्टी किती पहा
    आरमार उभारले,
    धोका सागर सीमेचा
    तट दूर्ग ते बांधले,
    रायगडी…….८
    युद्धनीती राजनीती
    नवे आदर्श निर्मिले,
    विस्तारुनिया स्वराज्य
    शत्रू जेरीस आणले,
    रायगडी……९
    मोजमाप जमीनीचे
    महा कार्य हे ठरले,
    पेढी बियांची स्थापिली
    कृषीवल धन्य झाले,
    रायगडी…….१०
    स्वाभिमानानं वागणे
    लोकांमधी रुजवले,
    असा आदर्श हा राजा
    नाव जगी हे गाजले,
    रायगडी…..११
    स्वप्न जिजाऊ मातेचे
    असे वास्तवा आणले,
    आण रायरेश्वराची
    आज स्वराज्य स्थापले,
    रायगडी सिंहासनीThank you for reading this post, don't forget to subscribe!
      शिवराय वाराजले …१२
      -सुधीर शेरे
      ९१६७००५०७७