• Mon. Jun 5th, 2023

येता पावसाच्या सरी..…

    येता पावसाच्या सरी
    धरा येई ओथंबून ।
    हर्ष होई चोहीकडे
    नाचे मोर आनंदून ।।
    भिजलेल्या धरेसम
    कुठे अत्तराला वास? ।
    बाप धरेस पुजतो
    सारे भुलूनिया त्रास ।।
    चोहीकडे हिरवळ
    पसरता वाटे छान ।
    जणू धरणीमातेला
    योग्य मिळाला सन्मान ।।
    होतो कास्तकार सुखी
    टिळा ललाटी लावतो ।
    बीज अंकुरण्या मग
    त्वरे पेरणी करतो ।।
    पांडुरंगा मायबापा
    कृपा अशीच ठेवजो ।
    पावसात सगळ्यांना
    आनंदाने भिजवजो ।।

    शब्दसखा:- अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी
    ता.दारव्हा, जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *