Contents hide
- मातीस नवती
- ढग लालूचले
- धुंद बरसले
- जीवभावे …
- आसूस देहास
- काकरली येली
- माती धना गेली
- आनंदाने….
- धरणी पोटुशी
- गर्भारता ल्याली
- काळजात व्याली
- विठामाई…..
- टरारता कोंब
- विसरली वेणा
- प्रसव वेदना
- फुलारल्या…..
- -विजय बिन्दोड
- पांढरकवडा.
- यवतमाळ