• Fri. Jun 9th, 2023

महाराष्ट्रात राजकीय भूकंप : मास्टरमाईंड पेचात..!

    महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी राजकीय भूकंप झाला. जी भीती महाराष्ट्रात सरकार बनल्यापासून होती तीच भीती काल सत्यात उतरली. पण या राजकीय भूकंपाच्या मास्टरमाइंडने मोठी स्ट्रोक मारला. पण त्यांचा हा मास्टरस्ट्रोक त्यांच्यावरच उलटलेला दिसतो.
    आज मास्टरमाईंड पेचात सापडलेला आहे. कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी सत्य हे कधीच ना कधी समोर येतेच. महाराष्ट्रच्या राजकीय भूमीत असे हादरे नवीन नाही. यामध्ये वर्तमान पक्ष फार मुरलेली आहेत.

    राजकारण हा अनिश्चितेचा खेळ आहे. कधी प्यादे आपली चाल बदलतील याचा नेम नाही. अन वर्तमान उद्धव ठाकरे यांना ज्या प्रमाणे अंधारात ठेवून ते बंड केलं ते नक्कीच शिवसेनेच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.जर बंडखोर आमदाराचा विरोध होता तर ते या विषयी उघड बोलू शकले असते. पण तसे झाले नाही.काय मास्टरमाइंडने जी रणनीती आखली त्यामध्ये शिवसेना अडकली.आज त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही.

    संविधानिक नैतिकता ही राजकारणासाठी आवश्यक असते. पण आजच्या कोणत्याही अनेक आमदार व खासदारात संविधानात्मक नैतिकता दिसत नाही. जनतेच्या मतावर निवडून येऊन जनतेला वाऱ्यावर सोडणार ही प्रवृत्ती आज सातत्याने वाढत आहे. स्वतःचा स्वार्थ, स्वतःची इज्जत यामध्ये मशगुल आहेत. कार्यकर्ते तिथेच आहेत. नेते मात्र मोठे होत आहेत. मग कोणताही पक्ष असो. स्वतःच्या नेत्याला ते सांभाळू शकत नाही.घटनेची पायमल्ली करायची ही रीत नवीन नाही. जनता हे सर्व पाहता आहे.एका हिंदुत्व नावावर या देशात सत्ता भेटू शकत नाही. तर तशी हवा करून बहुसंख्यांक हिंदू व हिंदू च्या नावावर खोटी आश्वासने अनेक पक्ष देऊन त्याचे शोषण करत आहेत. तरीपण हिंदू मतदार जागा होत नाही. आदिवासी,भटके-विमुक्त, ओबीसी हे जर हिंदू आहेत तर त्याच्या विरूद्ध कायदे का करण्यात येत आहेत.

    या प्रकरणात असे दिसते की महाराष्ट्रात येणाऱ्या काळात नवीन निवडणुकीला सामोरे जावे लागेल. ही प्रक्रिया नव्या विधानसभेच्या इलेक्शन ची नांदी ठरेल. जे मास्टरमाईंड आहेत ते जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्र हा दिल्लीपुढे कधी झूकला नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाचे अस्तित्व आहे असे नाही तर फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची परिवर्तनवादी भूमी आहे. जगाला व देशाला नवा मार्ग दाखवणारी ही क्रांतीभूमी आहे. महाराष्ट्रीयन जनता महाराष्ट्रसोबत द्रोह करणाऱ्या सा-या आमदारांना तसेच मास्टरमाईंडला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला तरी या भूकंपामुळे मास्टरमाईंड पेचात सापडला आहे. पाहुया किती दिवस पर्यंत तो पडद्याआड लपून राहतो….!

    -प्रा.संदीप गायकवाड
    9637357400
    (Images Credit : Loksatta)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *