Contents hide
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : इयत्ता बारावीच्या मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जून 2022 मध्ये जाहीर करण्यात आला. बारावीची शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात येणार आहे.
या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करावे. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज नियमित शुल्कासह शुक्रवार दि. 10 ते 17 जून 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाचे आहे, असे अमरावती विभागीया महामंडळाचे सहसचिव तेजराव काळे यांनी कळविले आहे.