• Tue. Jun 6th, 2023

बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै व दहावीची 27 जुलैपासुन सुरु होणार

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जुलै- ऑगस्ट 2022 मध्ये विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै पासुन आणि दहावीची पुरवणी 27 जुलै पासुन आयोजित करण्यात आली आहे.उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी सर्वसाधारण व द्विलक्षी विषय लेखी परीक्षा दि. 21 जुलै ते 12 ऑगस्ट, बारावी व्यवसाय अभ्यासक्रम 21 जुलै ते 8 ऑगस्ट, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 आहे.

    इयत्ता दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. 26 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022 व इयत्ता बारावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै, 2022 ते सोमवार दि. 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे अमरावती विभागीय मंडळाचे सहसचिव तेजराव काळे यांनी कळविले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *