बाप…

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    बाप घराचा आधार
    त्याची घारीची नजर,
    दु:खी पाहता लेकरा
    गोड लागे ना भाकर ||१||
    सुख दु:खाचा सारथी
    भार डोई तो पेलतो,
    गाढा संसारी ओढुनी
    धागा सुखाचा जोडतो ||२||
    घडे विपरीत काही
    ठोका हृदयी चुकतो,
    मन कावरं बावरं
    जीव थारी ना लागतो ||३||

    वारं वादळ झेलतो
    हार कधी ना मानतो,
    घर आनंदी ठेऊनी
    सुख आपुले शोधतो ||४||

    तळ हाता फोडापर
    जपे आपुला संसार,
    दु:ख स्वत:चे झाकुनी
    ठेवी सुखी परिवार ||५||
    हात सदा पाठीवर
    देई बळ लेकरास,
    येता संकटाचा वारा
    जीव लावतो पणास ||६||

    -संजय देशमुख
    पळसखेड जि. अमरावती.
    ९४२१७८९००९.