पोलीस..!

    आम्ही पोलीस पोलीस
    दुर्जनांस रे संहारु
    सज्जनांचे रे रक्षक
    नका म्हणू रे लुटारू !!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    धडा भ्रष्टास शिकवा
    नका घेऊ त्याची बाजू
    एकाच तराजुतून
    सारेच नका रे मोजू !!

    नका धावू भरधाव
    सिग्नल नकाच तोडू
    करा शिस्तीचे पालन
    नियम नका रे तोडू !!

    धरती आमची माता
    वर्दी आमुचे ईमान
    माते साठी वर्दी साठी
    आम्ही अर्पू हाचि प्राण !!

    हाती काठी साधी नसे
    कायदा रक्षक दंडा
    हिणवू नको रे पोरा
    मला वर्दीधारी गुंडा !!

    मीही तुमच्या सारखा
    कळपातील माणूस
    माणुसकीनेच वागू
    सारे होऊन माणूस !!

    गड्या जलातला मासा
    तो झोप घेई रे कैसा
    जावे त्याचेच रे वंशा
    सकळां तेव्हाची कळे !!

    वासुदेव महादेवराव खोपडे
    सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
    अकोला 9923488556