• Fri. Jun 9th, 2023

पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्‍यावी-उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) :पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत नाले सफाईचे काम वेगाने सुरू झाले आहे. जुन महिन्‍यात नाले सफाईचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्‍या. नाल्यांमध्ये कचरा साचू देऊ नये, अशा सूचना सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. नाल्यांमध्ये कोणी कचरा टाकेल, त्यांना खुणा करून नोटीस द्यावी. यानंतर शहरभरात सफाईच्या कामाला वेग आला आहे. संपूर्ण शहरात साफ सफाईची कामे सुरू झाल्याचे दावे महानगरपालिका प्रशासनाकडून केले जात आहेत. पावसाळ्यापूर्वी साफ सफाईचे काम पूर्ण केले जाईल.

    शहर परिसरात मोठे आणि छोटे नाले आहेत. त्यांच्या साफ सफाईचे काम वेगाने सुरू झाले आहे. महानगरपालिकेच्‍या उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम यांनी सांगीतले की, नाल्याच्या सफाईसाठी टीम तयार करण्यात आली. आपापल्या प्रभागात साफसफाई करण्याबरोबरच नाले सफाईचे कामही ते विशेष पाहत आहेत. काही नागरिक अजूनही नाल्यांमध्ये कचरा आणि घाण टाकत असले तरी अशा नागरिकांना चिन्हांकित करण्यास सांगितले आहे. पूरनियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पाणी साचल्यास पाण्याचा निचरा करता यावा यासाठी पंपिंग संच तयार करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर नियंत्रण कक्षही स्थापन करून कर्मचाऱ्याला जबाबदारी देण्यात आली आहे. रोस्टर बनवून स्वच्छता केली जात असल्याचे स्वच्छता निरीक्षक सांगतात. ते स्वतः नियमित साफसफाईच्या कामावर देखरेख करत आहेत. निष्काळजीपणासाठी कारवाई सुध्‍दा करण्यात येत आहे.

    प्रभाग क्र.१३ अंबापेठ, गोरक्षण अंतर्गत दिनाक १८/०६/२०२२ रोजी आलेल्या पावसामुळे प्रभागात नमूना, मुधोडकर पेठ, राजकमल चौक, चित्रा चौक, पंचशील टॉकीज परिसर मधील नाली वर लागलेले डाट काढण्‍यात आले. पावसाचे साचलेले पानी म.न.पा. नालीत सोडन्यात आले. दिनाक १९/०६/२०२२ रोजी वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) तथा उपायुक्त (सा.) डॉ.सिमा नैताम व स्वास्थ अधीक्षक एकनाथ कुलकर्णी यांनी राजकमल चौक आटो गली, मोची गल्ली येथे पाहणी केली आणि उचित मार्गदर्शन केले.

    वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) तथा उपायुक्त (सा.) डॉ.सिमा नैताम यांच्या आदेशानुसार दिनांक २०/०६/२०२२ रोजी प्रभाग क्र.१५ गवळीपुरा /छायानगर अंतर्गत येणाऱ्या प्रत्यक्ष पाहणी करून तिसरा नागोबा मंदिर जवळील कच-याचा मोठा डीगार म.न.पा. ट्रॅक्टर द्वारे उचलण्यात आले. प्रभाग क्र.५ महेन्द्र कॉलनी मधिल आसिर कॉलनी येथील श्री शोएब भाई वकील यांच्या घरा समोरील नाली व चेंबर साफ सफाई करण्यात आली व एवन किराणा समोरील सैफीया शाळेच्या कॉर्नर जवळील नाल्यांची चेंबर साफ सफाई करण्यात आली.

    प्रभाग क्र.२१ जूनीवस्ती प्रभागाअंतर्गत दैनंदिन नियोजित साफ सफाई अंतर्गत आज दिनांक २०/०६/२०२२ रोजी प्रभागाअंतर्गत मनपा सफाई कामगार द्वारे साफ सफाई करण्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर ची साफ सफाई करुन घेण्यात आली तसेच प्रभागाअंतर्गत कंत्राटी सफाई कामगार द्वारे पावसाच्या पाणीमुळे लागलेले दाट व परिसरातील नालीची साफ सफाई करुन घेण्यात आली. स्वागतम कॉलनी येथील श्री.खंबारडे यांच्‍या नालीच्‍या साफ सफाई ची प्राप्त तक्रारीनुसार साफ सफाई करुन घेण्यात आली. तसेच गोपाल नगर टी पाइंट वरील अंडर ग्राउंड चेम्बर ची जेट मशीनद्वारे साफ सफाई करण्यात आली असून प्रभागाअंतर्गत मनपा उर्दू शाळा क्र.१० मधील मुख्याध्‍यापक निखित परवीन यांच्‍याद्वारे सूचित केल्यानुसार संपूर्ण शाळांची साफ़ सफाई करुन घेण्यात आली.

    प्रभाग क्र.४ जमील कॉलनी / लालखडी येथील सहाय्यक आयुक्त झोन क्र.५ भाजीबाजार यांच्‍या आदेशानुसार यास्मिन नगर येथे अडचणीचे मोठे नाल्याची साफ सफाई करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) तथा उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम व सहाय्यक आयुक्त झोन क्र.३ यांच्या निर्देशानुसार प्रभाग क्र.१० बेनोड़ा-दस्तूरनगर मधील दिनांक २०/०६/२०२२ रोजी दस्तुरनगर झोन कार्यालय परिसर, दस्तुरनगर चौक परिसर अडचनीची नाली व चेतन्य कॉलनी श्री.कटरे यांच्या घरासमोरील नाली सफाई कामगार मार्फत साफ सफाई करण्यात आली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *