पावला मिरुग…

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    माह्या अंगणी अंगणी
    आले काळे काळे ढग
    आल्या पावसाच्या सरी
    मले पावला मिरुग !!
    मले पावला मिरुग
    रान भिजल रे सारं
    भुई झाली चिंब चिंब
    आला वारा गार गार !!
    आला वारा गार गार
    संगे मातीचा सुगंध
    दाह उकाडा उन्हाचा
    कसा झाला मंद मंद !!
    कसा झाला मंद मंद
    जीव आनंदले सारे
    घरट्यात विसावले
    पशु माणसं पाखरे !!
    पशु माणसं पाखरे
    फुला खुलले रे रंग
    आल्या पावसाच्या सरी
    मले पावला मिरुग !!
    -वासुदेव महादेवराव खोपडे
    सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
    अकोला 9923488556