Contents hide
- अशी तापते धरणी
- वारा उधळतो खूर
- वळीवाची वर्दी देत
- वीज कडाडते दूर
- नाही कुठला सांगावा
- येई धिंगाणा घालीत
- नको नको रे वळीवा
- पुन्हा चिखल मातीत
- दाळी साळी वाळवणं
- दारी तशीच पडून
- इथं वखूत कामाचा
- गेलं जळणं भिजून
- गाई वासरे रानांत
- गेला धनी राखणीला
- असा नडला काहून
- आला चारा कापणीला
- नदी,नाल्या डाबरीत
- टंच भरलयं पाणी
- आला मिरुग तोंडाशी
- कशा होतील पेरणी?
- चारी दिशा ढवळल्या
- तुझ्या वादळी येण्यानं
- सुने सुने झाले खोपे
- अशा भयार्त पाण्यानं
- थांब जरासा ढगांशी
- कळा उन्हाच्या सोसत
- मग येशील मातीचा
- मृदगंध उडवत
- का रे उतावीळ असा?
- धावा तुझा अवकाळी
- दयाघना रे स्वप्नांना
- नको घेऊ पायदळी
- -सतिश कोंडू खरात
- वाशिम
- ९४०४३७५८६९