- * आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते ३१ लाभार्थ्यांना पट्टे वाटप !
मोर्शी : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे. तो अतिक्रमित असला तरीही त्याला घर बांधण्याचा पूर्ण हक्क आहे. याकरिता महाविकास आघाडीने घेतलेल्या धोरणानुसार नागरिकांच्या अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. यावेळी ३१ कुटुंबांना आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते पट्टे हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी मोर्शी येथील ३१ नागरिकांचे एफ क्लास जमिनीवर असलेले अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना हातोहात पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी पआमदार देवेंद्र भुयार, उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, मोहन मडघे, घनश्याम कळंबे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, मयूर राऊत, पंकज राऊत, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
मोर्शी येथे काही वर्षांपासून काही कुटुंब एफ क्लास जमिनीवर राहत होते. मात्र, त्यांच्याकडे हक्काचे घर नसल्याने आमदार देवेंद्र भुयार यांनी पाठपुरावा करून हक्काची जागा ३१ कुटुंबांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल मोर्शी येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.