• Wed. Jun 7th, 2023

कृषी निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार आढळल्यास भरारी पथकाकडे तक्रार करा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : कृषी निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके निर्माण करण्यात आली असून, तसे आढळल्यास भरारी पथकाला तत्काळ , संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.

  जादा दराने विक्री, मुदतबाह्य मालाची विक्री, साठेबाजी, अनधिकृत निविष्ठांची विक्री अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भरारी पथक व तक्रार निवारण कक्ष स्थापण्यात आला आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी क्र. 9325962775 आणि कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 असा आहे.

  या क्रमांकावर संपर्क साधा

  कृषी विभागाने पथकांचे संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत. त्यावरही तक्रार करता येईल. त्यानुसार जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दादासो पवार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8975815204, तर कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख यांचा भ्रमणध्वनी क्र. 9422855587 असा आहे. जिल्हा कृषि अधिकारी अजय तळेगावकर यांचा भ्रमणध्वनी क्र. 7588085827, जिल्हा कृषी अधिकारी उज्वल आगरकर यांचा क्र. 9763519754 आहे. मोहिम अधिकारी एल. जी. आडे यांचा संपर्क क्र. 8275068639 असा आहे.

  पंचायत समित्यांतील पथकांचे क्रमांक

  अमरावती व तिवसा पंचायत समितीतील कृषी अधिकारी उध्दव भायेकर भ्र. क्र. 8275283001, भातकुली पं. स. मधील कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण यांचा क्र. 7774884148, नांदगाव खंडेश्वरचे कृषी अधिकारी लक्ष्मण खांडरे यांचा 8275229532, चांदूर रेल्वेचे कृषी अधिकारी प्रकाश खोबरखडे यांचा 9763737259, धामणगाव रेल्वेचे अधिकारी पवन ढोमणे यांचा 9595903320, मोर्शीचे कृषी अधिकारी राहूल चौधरी यांचा भ्र. क्र. 9421827693 असा आहे.

  वरूड पं. स. कृषि अधिकारी राजू सावळे यांचा भ्रमणध्वनी क्र. 8379909305, चांदूर बाजार येथील नारायण आमझरे यांचा 9421790525, अचलपूर कृषी अधिकारी रवी उईके यांचा 9404075276, अंजनगाव सुर्जी येथील अश्विन राठोड यांचा 9422016056, दर्यापूरचे पं. स. कृषी अधिकारी सुरेश रामागडे यांचा 9096238655 असा आहे. धारणी पंचायत समितीतील कृषी अधिकारी धैर्यशील पाटील यांचा भ्रमणध्वनी क्र. 8275935084, तर चिखलदरा येथील शालिनी वानखडे यांचा क्र. 9049555011 असा आहे.

  तालुका कृषी अधिका-यांचे क्रमांक

  अमरावतीचे तालुका कृषी अधिकारी किशोर हातांगळे यांचा भ्रमणध्वनी क्र. 9405281646, तर भातकुलीच्या सुनंदा दळवी यांचा 9172772457 असा आहे. नांदगाव खंडेश्वरचे तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांचा भ्र. क्र. 7875421450, चांदूर रेल्वेचे आर. डी. बांबल यांचा 8975961695, धामणगाव रेल्वेचे राजेश वालदे यांचा भ्र. क्र. 8928040467, तर तिवस्याचे तालुका कृषि अधिकारी अनिल कांबळे यांचा संपर्क क्र. 9404611414 असा आहे.

  मोर्शी येथील तालुका कृषी अधिकारी संजना इंगळे यांचा संपर्क क्र. 9673242117, तर वरुड तालुका कृषि अधिकारी कल्पना काणे यांचा भ्र. क्र. 9145782149, चांदूर बाजार येथील शिवाजी दांडेगावकर यांचा 7798297955, अचलपूर येथील स्नेहल ढेंबरे यांचा 7249808836, अंजनगाव सुर्जीचे राजाभाऊ तराळ यांचा 8669064611 व दर्यापूरचे आर.टी. अडगोकर यांचा 9850175401 असा आहे. धारणीचे तालुका कृषी अधिकारी आर. जी. पाडवी यांचा भ्र. क्र. 9922128199 व चिखलदरा येथील व्ही. एस. पथाडे यांचा 9604741733 असा आहे. या क्रमांकांवर संपर्क करून कृषी निविष्ठांबाबतची तक्रार दाखल करावी, असे आवाहन श्री. खर्चान यांनी केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *