एका उमेदवाराने दोन जागेवरून निवडणूक लढवण्यास बंदी

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    नवी दिल्ली : एकाच उमेदवाराने दोन किंवा त्यापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवू नये, याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. नवनिर्वाचित मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तसेच काही महत्त्वाचे बदल ही राजकुमार यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात दिले आहेत.

    नव मतदाराचे मतदार कार्ड लिंक असणे तसेच निवडणूक जाहीर झाल्यानंतर जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर दाखवण्यास बंदी आणणे याबाबतचे प्रस्तावही केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपयर्ंत कोणत्याही जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित केल्या जाऊ नयेत, याबाबतचा महत्त्वाचा प्रस्ताव दिल्याने केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे.

    केंद्र सरकारने हे बदल मान्य केल्यास लोकप्रतिनिधी कायदा १९९१च्या नुसार कलम ३७ (१) माझे मोठे बदल होतील. महत्त्वाचे म्हणजे एकाच वेळी दोन जागेवर आपले नशीब आजमावणार्‍या उमेदवाराला असे करता येणार नाही. तसेच राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाकडे सोपवावे, याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला सुचवलेले हे महत्त्वाचे बदल होतील का? याबाबत आता केंद्र सरकार विचार विनिमय करणार आहे.