Contents hide
- आता तरी बरस बाबा
- वांझोटे ढग आणू नको
- चादर फाटेल बळीची
- इतकी मात्र ताणू नको
- नुसताच मांडव केलास
- सरीवर सरी बरसू देत
- आकाशी भिडले डोळे
- झाडं वेली आणि शेत
- दरवळू दे सुगंध आता
- इथल्या निर्मळ मातीचा
- पेटू देत चुल्हा बळीचा
- उजेड दिव्याच्या वातीचा
- वर्षभराची खेप असती
- रिकाम्या हाती नको धाडू
- दुबार पेरणीच संकट
- त्याच मातीत नको गाडू
- शेती मातीचा भरोसा
- निसर्गाच्या देणगीवर
- उभं आयुष्य पेटलेला
- या लहानशा ठिणगीवर
- कोलाहल नच करता
- शांततेतेचाच फेर धर
- कोमेजलेल्या मुखावर
- आशिषाचा वर्षाव कर
पी के पवार
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१