Contents hide
- वाहे थंडगार वारा
- ढग आभाळ भरून
- स्वागताला पावसाच्या
- धरती तयारी करून
- ढोल ताशांचा नगारा
- सौदामिनी नृत्य करी
- डोक्यावर पावसाच्या
- येती बघा सरीवर सरी
- सुरुवात पावसाची
- अंगण ओलेचिंब होई
- शेतातील आया बाया
- भारा असे वरी डोई
- भर कडाका उन्हाचा
- कासावीस होई जीव
- पहा कोसळता सरी
- येई निसर्गाला किव
- हवाहवासा वाटावा
- सृजनाचा हा पाऊस
- सखी साजणी फेडते
- भिजून पाण्यात हौस
- संपलिया आतुरता
- येता पाऊस हा दारी
- लगबग झाली सुरू
- बळीराजाची तयारी
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१