• Sat. Sep 23rd, 2023

आयटीआय डिप्लोमा धारकांना थेट पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षात प्रवेश

दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच प्रवेश अर्ज करण्याची सुविधा

  आयटीआयचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कोणत्याही ट्रेडमधून आयटीआयचे शिक्षण पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना आता पोलिटेक्निकच्या दुस-या वर्षात थेट प्रवेश मिळणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ ऑनलाइन प्रणाली पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या तीन फे-या असणार आहेत. पोलिटेक्निक प्रवेशाची एक फेरी गेल्यावर्षी कोरोनामुळे कमी करण्यात आली होती. मात्र, यावर्षी एक फेरी वाढविण्यात येणार असून तंत्रशिक्षण विभागाकडून यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना चांगली टेक्नॉलॉजी देत असल्याचेही सांगण्यात आले.

  दहावी निकाल जाहीर होण्याआधी १५ दिवस आपण पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचा फॉर्म भरणार आहोत. दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर या पोर्टलवर बोर्डाकडून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे मार्क अपलोड होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुन्हा कागदपत्र घेऊन फिरण्याचा त्रास कमी होणार आहे.

  मातृछत्र आणि पितृछत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना २६० पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये २ जागा राखीव असणार आहेत. तसेच काश्मिरी पिडितांच्या मुलांना महाराष्ट्रात शिक्षण घेण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच दिल्लीतील जुने महाराष्ट्र युपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्याचा निर्णय शिक्षणविभागाने घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना दिल्लीत दुस-या कुणाच्या आश्रयाची गरज नसेल.

  दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना इतर आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतिही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे.

  डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्‌घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्ययावत वेबसाइटचे लोकार्पण झाले. याचवेळी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पॉलिटेक्‍निक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे जाहीर केले. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पॉलिटेक्‍निकला प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालापूर्वी अर्जात माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

  विद्यार्थ्यांना वेबसाइटवरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्याची निश्‍चिती करावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ या वर्षात इयत्ता दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रता तपशीलामध्ये स्वत:चा आसनक्रमांक भरावा लागणार आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण करावा लागणार आहे.

  शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
  कमळवेल्ली,यवतमाळ
  भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,