• Mon. May 29th, 2023

आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली खासदार शरदचंद्र पवार यांची भेट !

  *आमदार देवेंद्र भुयार यांनी आघाडीच्या उमेदवारालाच मतदान केले -अनील पाटील
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  मोर्शी (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकी संदर्भात अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर झालेल्या चुकीच्या आरोपाबाबत मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेऊन खासदार संजय राऊत यांच्या कडून झालेल्या आरोपाबाबत सर्व घटनाक्रम आमदार देवेंद्र भुयार यांनी खासदार शरदचंद्र पवार साहेबांना प्रत्यक्ष भेटून सांगितला.

  अपक्षांच्या मतदानावर राज्यसभा निवडणुकीची चुरस निर्माण झाली होती. पराभवाच खापर संजय राऊत यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह अपक्षांवर फोडले. त्यानंतर मात्र आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांचं वक्तव्य मोडीत काढलं. महा विकास आघाडीच्या निर्देशानुसार मतदान मतदान केलं आहे असं आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मला पसंतिक्रम ठरवून दिलेल्या उमेदवारांनाच मतदान केले त्यामध्ये मी पसंती क्रमानुसार संजय पवार यांना १ पसंतीक्रमाचे मत देऊन संजय राऊत यांनी २ पसंत क्रम, प्रफुल पटेल यांना ३ पसंती क्रमाचे मत देऊन मतदान केले असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट सांगितले.

  आमदार देवेंद्र भुयार हे मतदानाच्या ३ दिवस पूर्वीपासूनच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रियाताई सुळे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आमदार यांच्या कायम संपर्कात होते. मतदानाच्या दिवशी उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये सर्व आमदारांना अजित पवारांनी पसंतिक्रम क्रम ठरवून दिला त्याच पसंतिक्रमा नुसार आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदान करून परत येताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अरविंद सावंत व अनिल देसाई यांनी भेट घेऊन सर्व नेत्यांच्या समोर पसंतिक्रम सांगितला त्यामुळे आम्ही भाजपला मतदान करण्याचे काही कारण नाही उलट या राज्यसभा निवडणुकीमध्ये माझे विरोधक डॉ बोंडे हे राज्यसभा उमेदवार असल्यामुळे त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला मतदान करण्याचा मूर्खपणा मी कदापि करणार नाही.
  विधानसभा निवडून आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्री पदाची ऑफर मला दिली होती सर्व गरजा पूर्ण करण्याची सुद्धा ऑफर दिली होती, रात्रीच्या शापथविधीच्या वेळी सुद्धा भाजप कडून मला मोठी ऑफर हाती मंत्री पदाची सुद्धा ऑफर होती तेव्हा मी त्या प्रलोभणाला बळी पडलो नव्हतो असे आमदार देवेंद्र भुयार यांनी खासदार शरदचंद्र पवार यांना सांगितले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *