• Tue. Sep 19th, 2023

आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते ७८ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    * लोणी, झोलंबा, नटाळा, शिंगोरी, ईत्तमगाव येथील विकासकामांना सुरुवात !
    * आमदार देवेंद्र भुयार यांचे गावकऱ्यांनी मानले आभार !

    वरुड : आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रश्न मांडून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या कडे निधीची मागणी केली. वरुड मोर्शी तालुक्याचा सर्वांगीण विकास व कायापालट करण्याचा संकल्प घेऊन आ. देवेंद्र भुयार यांनी आपल्या अडीच वर्षांच्या काळातच भरघोस निधी खेचून आणला आहे. या निधि अंतर्गत मोर्शी विधानसभा मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरु असल्याने वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळत आहे.

    वरुड तालुक्यातील “ग्राम लोणी” येथे मनरेगा अंतर्गत अनिल शिरभाते ते कमलाबाई कुबडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करण्याकरिता 20 लक्ष रुपये मंजूर करून रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला, ग्राम झोलंबा येथे 2515 निधी योजना अंतर्गत “अंकुश नेहारे ते रंगरावजी कुंबरे यांच्या घरापर्यंत” सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करण्याकरिता 12 लक्ष 75 हजार रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली, ग्राम-नटाळा येथे 2515 निधी योजना अंतर्गत भागवत वानखडे ते वामनराव वानखडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाकरिता 07 लक्ष रुपये, नटाळा येथील मारोती देवस्थान च्या विहिरीपासुन ते ज्ञानेश्वर धोटे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करण्याकरिता 5 लक्ष 75 हजार रुपये, शिंगोरी येथे 2515 निधी योजना अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याकरिता 07 लक्ष रुपये, इत्तमगाव येथे 12 लक्ष 75 हजार रुपये, इत्तमगांव येथील मुख्य रस्ता लगत शंकरराव बारस्कर यांच्या घरापासून ते छोटू राऊत यांच्या घरापर्यंत 2515 मुलभूत सुविधा अंतर्गत रस्ता बांधकाम करण्याकरिता 7 लक्ष रुपये, सहकारी सोसायटी पासुन ते आशिष जवंजाळ यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे करिता “5 लक्ष 75 हजार रुपय, या सर्व विकास कामांकरिता आमदार देवेंद्र भुयार यांनी 78 लक्ष रुपयांच्या निधीची तरतुद करुन दिली असून रस्त्याचे काम पुर्ण झाले असुन या रस्त्याचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते पार पाडण्यात आला. यावेळी ग्राम इत्तमगाव येथील “भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले सागर धनराजजी लांडे यांचा देशसेवेबद्दल शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

    यावेळी आमदार देवेंद्र भुयार, माजी पं स सभापती कमलाकर पावडे, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, सरपंच सौ. रत्नकलाबाई खंगार, सरपंच प्रवीण मानकर, सतिश पाटणकर,उपसरपंच अमोल बडोदे, सरपंच सौ अपर्णाताई आखरे, सतिश पाटणकर संजय राऊत, अशोकराव राऊत, मदनराव ता्थोडे, सौ.अश्विनीताई दवंडे, उपसरपंच श्री. रविकांतभाऊ तिखे, वसंतराव बारस्कर,रमेशराव बोरकर, अरुणरावजी खेरडे, अजय बावणे, सौ.चंदाताई फुले, सौ.मंदाताई इरपाची,सतिश पाटणकर,सौ.जोस्त्नाताई धोटे, निर्मलाताई टेकाम, अशोक धोटे, देविदास टेकोडे, किशोर टेकोडे, नितेश धोटे,बाळु टेकाम, पंकज धोंडे, प्रतिक पावडे,आशय शंभरकर,हेमंत कोंडे, प्रेम वानखडे, तेजस चौधरी, रमेश शिंदे,प्रवीण श्रीराव, नरेंद्र इंगोले, गजानन पाथरे, अमोल अलोणे, रमेश अलोणे, विश्वेश्वर नवघरे, किसनराव चाफले, मोहन पाथरे, अजय राऊत यांच्यासह लोणी, झोलंबा, नटाळा, शिंगोरी, ईत्तमगाव येथील सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,