• Wed. Jun 7th, 2023

आधुनिक पद्धतीने जीवन जगण्यासाठी आर्थिक व डिजीटल साक्षरता काळाची गरज- राजेंद्र कावळे

    *दिघी येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता एकदिवसीय शिबिर संपन्न
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    कारंजा (प्रतिनिधी) : एनजीओ नीट फाऊंडेशन यांच्या वतीने दिघी गावी डिजिटल आर्थिक साक्षरता कार्यक्रम आधुनिक जीवन जगण्यासाठी आर्थिक व डिजीटल साक्षर होणे आवश्यक, माहिती व आयोजन नीट फाऊंडेशन चे प्रशिक्षक राजेंद्र कावळे साहेब यांनी केले.

    त्यांनी बँकेचे व्यवहार, बचत खाते, चालू खाते, विम्याचे महत्व व त्याचा योग्य वापर, योग्य ए.टी.एम चा वापर, अर्थिक फसवणूक पासून सावध, बनावटी कॉल्स पासून सतर्कता, केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या योजनेपासून सामान्य वर्ग वंचित असतो जसे की, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, विशेष म्हणजे दहा वर्षाखालील मुलींसाठी प्रधानमंत्री सुकन्या समृध्दी योजना बचत खाता, प्रधानमंत्री श्रमनिधी मानधन पेन्शन योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, किसान सन्मान निधी योजना, ई श्रम ओळख पत्र, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना या सर्व योजना सर्व सामान्य जीवनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत या बाबत मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले.

    गावांतील महीला वर्ग हा डिजिटल व्हावा ए.टी.एम चे व्यवहार डिजिटल व्यवहार करावा विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जनतेमधे अर्थिक व्यवहार कसे असले पाहिजे व डिजिटल तंत्रद्यान तसेच चांगल्या पैशाचे व्यवस्थापन या विषयी जनजागृति करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अर्थिक सौजन्य फिनकेअर बँक च्या वतीने यावेळी गावातील जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी फिंनकेअर बँक चे सी. एस.आर वरिष्ठ अधिकारी सौरभ वार्डेकर साहेब, तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत सहभाग प्रमाणपत्र चे वाटप देखील करण्यात आले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *