Contents hide
- इतिहासात तु तुझ्या शौर्याने
- गाजवली रणागंणे
- पण इतिहासाने साधी नोंदही घेतली नाही
- तुझा उलगुलान हा सुरूच राहणार जल जमीन आणि जंगलासाठी
- तुझ्या शौर्याचे प्रतिक तिरकमठा
- तू जपत आला आहे सदैव
- पण आता तुला लेखणीने
- व्हावे लागेल सज्ज
- शिक्षणाचा चोखळून मार्ग करावे लागेल नवे युद्ध
- शालवृक्षाच्या सानिध्यात नांदणारी आदिवासी संस्कृति
- बुद्धांच्या विचारांनी गौरवान्वित झाली पाहिजे
- तू मूळनिवासी या धरतीचा
- तु पुत्र नागसंस्कृतीचा
- ईथल्या भूमीपुत्रांना
- वनवासी ठरू पाहणाऱ्या
- पुसाव्या लागतील तुला पाऊलखुणा
- हिंसेने होतो रक्तपात
- चालुया सर्व मिळूनी सोबत
- या तथागत बुद्धांच्या पथावरी.
- -सुरेश भिवगडे
- ग्रंथपाल
- सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी जिल्हा वर्धा
- (Images Credit : Facebook)