होते लयी हुरहूर....!
नको जाऊ दुरदूरं
वार्धक्यात माझ्या राजा
होते लयी हुरहूरं (धृ)
येते तुह्या घरी बाबा
धुणी भांडी कराया
तुझ्या लेकराचे राजा
मऊमऊ बोट धराया
परगावी जातो म्हनून
बाप करी कुरकूरं
वार्धक्यात माझ्या राजा
होते लयी हुरहूरं
शियं पायं देजो बाबा
ताजं ताजं नको देवू
जमान्याची मनामंधी
काई लाज नको ठेवू
रखवाली करु राजा
देवू लक्ष पुरेपूरं
वार्धक्यात माझ्या राजा
होते लयी हुरहूरं
शिकवला पढवला
सायेब केला मोटा
खडाखडा मोजतोया
तु कोऱ्या कोऱ्या नोटा
सुटाबुटात राह्वां राजा
नाई करत कुरकुर
वार्धक्यात माझ्या राजा
होते लयी हुरहूरं
आले किती गेले किती
उन्हाये पावसाये
सदाईच जीवनात
लयी दुःख दरवये
सोडून शन्या आई बाबा
नको पवू दुरदूरं
वार्धक्यात माझ्या राजा
होते लयी हुरहूरं
आयुष्यात तुह्या पायी
मोटी केली मरमरं
मांडीवर निजला होता
फिरे जाते घरघरं
सपनाचा आटा झाला
डोये होई चुरचूरं
वार्धक्यात माझ्या राजा
होते लयी हुरहूरं
-पी के पवार
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१
0 टिप्पण्या