Recent in Technology

Advertisement

Breaking News

तथागत....

    सिध्दार्थ गौतमा!
    तुझी प्रज्ञा शिल करूणा
    या विश्र्वात विलसते
    अ,न अंहिसेच्या गोञाची
    एकमेव जननी होवून जाते
    तुझे अंहिसामूलक तत्वज्ञान
    झालेय आज विश्र्वाचा मूलमंञ
    बुध्दा तू एक समता बंधूतेचा पूजारी मैञी भावनेचा एक सुंदर मिलाफ तुझ्या वाणीतून
    दर्वळतो सारखा सारखा
    तकलादू धर्माच्या ठेकेदारांनी
    विषमता कालवून मानसाला केले एकमेका हो पारखा
    शांती करूणा मैञी
    तुझ्या वाणीचे अनमोल सार
    तुच थांबवू शकतोस आता
    कोणतेही वैश्र्विक वार
    जळी तळी काष्टी पाषाणी
    फक्त तू आणि तूच आहेस
    गिरीकंदरात,दूर्गम कडे कपारीत,रानावनात
    माञ ते निघालेत आता
      तुझा ईतिहास मिटवायला
      तुझ्या शिल्पांचे ,तुझ्या लेन्यातील सर्वागध्वस्त करायला
      ते निघालेत विद्रूपीकरण
      करायला
      पण ते आता मीटणार नाही
      तु तर केंव्हाचाच विराजमान आहेस
      विश्र्वाच्या गळ्यातील ताईत
      तु विज्ञानाचा वारकरी
      तु दुःखीतांचा तारकरी
      तुझा धम्म हे तर आहे
      मानवी दुःखावरील
      एक महान अमृत संजीवनी
      आता तर विश्र्वात तुझीच धम्मगाथा
      गाजतेय गावागावात
      अ,न हरेक विहारात
      आज जयंती तुझी गौतमा
      कोटी कोटी वंदन तुला
      एकमेव करुणा सागरा
      माझे हे वंदन पुन्हा पुन्हाss
      -शिवा प्रधान
      भोवते ले आउट
      अमरावती
      मोबा.७०५७६०५९६८
      (छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code