Recent in Technology

Advertisement

Breaking News

अव्यक्त अबोली दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : पुलगाव येथे अशोक स्तंभजवळ, आठवडी बाजार, पुलगाव, ता.देवळी,जि.वर्धा दि.8 मे 2022ला संपन्न झाले.

    साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष मा.सीमा मेश्राम ,अमरावती(अखिल भारतीय आंबेडकर साहित्य महामंडळ,अध्यक्ष),स्वागताध्यक्ष मा.राजेश पोहरे ,प्रमुख अतिथी म्हणून सुषमा कळमकर, रजनी फुलझेले ,कुंदनभाऊ जांभुळकर, संजय ओरके उपस्थित होते.सिमा मेश्राम आपले अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या," आंबेडकरी कवी व कवयित्री यांनी पारंपरिक प्रतिमा चा वापर न करता बौद्ध व नूतन प्रतिमा संशोधन व समीक्षा करून शोधाव्या.वास्तविक व जीवनसंघर्षोतून साहित्य जन्माला घालावे."

    सत्र दुसरे यात परिसंवाद घेण्यात आला.परिसंवादाचा विषय खालीलप्रमाणे" बदलती व्यवस्था आणि संविधान ".अध्यक्ष म्हणून डाॅ.संदीप हातेवार, वक्ते म्हणून डाॅ.अरविंद पाटील, प्रा.प्रमोद नारायणे,डाॅ.सुनंदा रामटेके उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा.प्रविण कांबळे यांनी केले.आभार गझलकारा वृषाली मारतोडे यांनी केले.एकपात्री प्रयोग रंजना जीवने यांनी सादर केला.हा प्रयोग सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर होते.त्यांचा सत्कार जयश्री चव्हाण (आयोजक, अव्यक्त अबोली साहित्य मंच)यांनी केला.

    नंतर कविसंमेलन पार पडले.अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री सुनिता इंगळे(मूर्तीजापूर, जि.अकोला)अतिथी कवी म्हणून प्रशांत ढोले,प्रकाश बनसोड, सुरेश वंजारी,प्रा.किरण पेठे,योगेश ताटे उपस्थित होते.कवीसंमेलनात खालील कविंनी आपल्या दमदार ,वैचारिक, आंबेडकरी जाणिवा जागृत करणा-या कविता सादर केल्या.प्रतिक्षा मांडवकर,आचल काळे,प्रकाश जिंदे,रत्ना मनवरे,निलेश तुरके, अक्षय गहुकर, मनोहर मानवटकर, पद्माकर अंबादे,धर्मेद्र अंबादे,सुचिता कुनघटकर, सोपान दातार,प्रभु फुलझेले,रजनी फुलझेले,प्रीतीबाला बोरकर,अशोक कांबळे,करूणा मून,सुनिता बागडे,विक्रांत शेवारे, शोभा वेले,छत्रपाल तामगाडगे,प्रफ्फुल लोणकर, सुषमा कळमकर, संध्या रायटक,शिला आठवले,जयश्री चव्हाण, सुरेश भिवगडे,अनुश्री प्रवीण कांबळे इ.नी कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे बहारदार संचालन प्रा.प्रविण कांबळे यांनी केले.आभार प्रदर्शन योगेश ताटे यांनी केले.हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी जयश्री चव्हाण, योगेश ताटे,शिला आठवले,संध्या रायठक, डाॅ.भूषण रामटेके,संजय ओरके व अव्यक्त अबोली साहित्य मंचचे सदस्य यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code