Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्तव्यपूर्ती यात्रा - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

  * अचलपूर तालुक्यात 11 ते 17 मे दरम्यान ठिकठिकाणी उपक्रम
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी संकल्पनेनुसार कर्तव्यपूर्ती यात्रा उपक्रम दि. 11 ते 17 मे दरम्यान मेळघाट विधानसभा क्षेत्रातील अचलपूर तालुक्यात ठिकठिकाणी राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या सर्व विभागांशी संबंधित अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली.

  जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने मेळघाटातील विविध गावांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार धारणी तालुक्यातील शिंदी बु. येथे बुधवार दि. 11 मे रोजी कार्यक्रम होईल. शिंदी बु. पोही, हरम, आरेगाव, भिलोना, कोपरा, वडनेर भुजंग, कुष्ठा खु. टवलार, खांजमानगर व गुरूवार, दि. 12 मे रोजी कांडली येथे कार्यक्रम होईल. कांडली, कोठारा, खरपी, सालेपुर, पांढरी, बेलखेडा, रवीनगर, आदी विविध गावातील नागरीकांना त्यात सहभागी होता येईल.

  पथ्रोट येथे शुक्रवार दि. 13 मे रोजी मेळावा होणार असून, पथ्रोट, जवलापूर, वाघडोह, जनोना, कासमपूर, रामापूर, परसापूर, गोंड वाघोली, पायविहिर, उपातखेडा, ठोकबर्डा, बाल्मीकपूर, आदी ग्रामपंचायतीत समाविष्ट गावांतील बांधवांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे, गौरखेडा कुंभी येथे 14 मे रोजी कर्तव्यपूर्ती यात्रा होणार असून, गौरखेडा कुंभीसह नर्सरी, नर्साळा, मडकी, औरंगपूर, वैराट, मल्हारा, वझ्झर, मोहीफाटा बुरळघाट, निमकुंड, कालबीट, म्हसोना, बेलखेडा, वडूरा, मेमना, धोतरखेडा, गोंडविहिर, धामणी गावांचे नागरिक त्यात सहभागी होतील.

  धामणगाव गढी येथे 17 मे ला होणा-या उपक्रमात धामणगाव गढी, एकलासपूर, सावळी दातुरा, वडगाव, हनवतखेडा, दर्याबाद,निमदरी, शहापूर, येणीपांढरी, चांदुरा, जलालखेडा, देवगाव, पिंपळखुटा, खटकाली, नयाखेडा आदी विविध गावांचे नागरिक सहभागी होतील.या मेळाव्यात सर्व विभागांची कार्यालये सहभागी होतील. मेळघाटातील दुर्गम भागातील, तसेच गोरगरीब नागरिकांच्या अडचणींचे कर्तव्यपूर्ती यात्रेच्या माध्यमातून निराकरण करण्यात येईल. मेळघाटातील बांधवांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री श्री. कडू व आमदार श्री. पटेल यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code