Recent in Technology

Advertisement

Breaking News

भाज्यांची नवलाई...

    ज्या कुठेच मिळत नाहीत
    त्या नागपूरला मिळतात
    चवीने खाणार त्यालाच
    स्वादही नक्कीच कळतात!!
    उन्हाळ्यातील घोळ भाजी
    आंबट कैरीची त्याला जोड
    कुठलाही असो घोळ घोटाळा,
    पीठ पेरून भाजीला नाही तोड!!
    घोळ घोळ बघा फक्त विदर्भाची
    नव नवलाईची भाजी उन्हाळ्याची
    मुंबई पुण्यात हीची मागणी भारी
    जातांना प्रवासी नेई पिशवी भाजीची !!
    गावरान भेद्र गोल गोल चपटे
    लाल, हिरवा रंग मस्त दिसे
    खायला स्वादिष्ट आंबट थोडे
    भाजून कुचला करावा असे!!
    भेद्राची आंमटी होते खासच
    गुळखोबरं आलंलसून,दाण्याचा कुट
    हिरवागार कोथिंबीर पेरून
    कशी प्यावी मस्त गुटगुट!!
    आता आणुया भटईला
    काटेरी छोटी कडवट चवीला
    हिरव्या रंगाची,करा मसालेदार
    अहो मिळते फक्त नागपूरला !!
    अशी भाज्यांची नवलाई
    आहे विदर्भाची महती
    मुंबई पुण्यात नाही कळणार
    तेवढी आहे विदर्भाची ख्याती!!
    पिठलं भाकर झणझणीत ठेचा
    प्रचलित आमच्या विदर्भाचा
    नवलाई सगळ्यांनाच असे
    खायला स्वादिष्ट एक नंबरचा!!
    हर्षा वाघमारे
    नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code