- * जिल्हा प्रशासनाची गतिमान कार्यवाही
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : डोलार गावातील ८२ पुनर्वसित व्यक्तींनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतील घरांचा मोबदला चार वर्षापासून मिळाला नसल्यामुळे आंदोलन केले. याप्रश्नी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने गतिमान कार्यवाही केल्यामुळे पुनर्वसितांना घराचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुनर्वसित बांधवांची मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी वनविभागाशी चर्चा करून या विषयासंदर्भात 4 मे रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार मौजा डोलार, मालूर या गावाकरीता घरांसाठी एकूण मोबदला रक्कम 16 कोटी 30 लक्ष रू. निधी वितरणाचे आदेश देण्यात आले आहेत.
मुल्यांकनाच्या एकूण रु. 18 कोटी 80 लक्ष रकमेस मान्यताही देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुनर्वसित लाभार्थ्यांना मान्सुनपूर्व लागवडीसाठी व उपजिविकेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.याप्रकरणी गतीने कार्यवाही होऊन निधी वितरण होत असल्यामुळे डोलार व इतर गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या