Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

पावसाळ्यात संभाव्‍य आपत्‍ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी समन्‍वयाने काम करावे -मनपा आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : हवामान खात्‍याने राज्‍यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्‍यापेक्षा जास्‍त पाऊस पडण्‍याच्‍या अंदाज वर्तवला आहे. पावसाच्‍या कालावधीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाच्‍या दृष्‍टीने मनपाच्‍या सर्व यंत्रणांनी सज्‍ज असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्‍तीच्‍या काळात सर्व संबंधीत मनपा यंत्रणांनी समन्‍वयाने काम करावे असे मनपा आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी सांगितले.

    अमरावती महानगरपालिकेने “नैसर्गिक आपत्‍ती उपाय योजना आराखडा” तयार केला असुन अमरावती शहरात नैसर्गिक आपत्‍तीच्‍या वेळी आवश्‍यक ती उपाय योजना तयार करण्‍याच्‍या दृष्‍टीने आपतकालीन कक्षाचे प्रमुख म्‍हणुन उपायुक्‍त (प्रशा.) श्री. सुरेश पाटील मो.क्र.८३५६८५०५४६ यांची नियुक्‍ती केली आहे. प्रभागा अंतर्गत आपत कक्षाचे प्रमुख संबंधित सहाय्यक आयुक्‍त हे राहतील. या बैठकीत अनेक महत्‍वपुर्ण विषयांवर चर्चा करण्‍यात आली जसे की, आपत्‍ती व्‍यवस्‍थापना कक्षाची झोन निहाय स्‍थापना करणे, महानगरपालिकेच्‍या विविध विभागांकरिता SOP (Standard Operating Procedure) तयार करणे, शोध व बचाव पथकाची स्‍थापना करणे, शहरातील नाल्‍यांच्‍या गाळ काढणे, विद्युत/प्रकाश व्‍यवस्‍था अद्यावत ठेवणे, शहरातील संभाव्‍य पुरग्रस्‍त भागाचा शोध घेऊन नोंद ठेवणे, औषधी साठा पुरवठा व वितरण व्‍यवस्‍था करणे, ब्लिचींग पावडर व इतर रोग नियंत्रक इत्‍यादीची फवारणी करणे, आपातकालीन स्थितीत निवा-याची व्‍यवस्‍था करणे, शहरातील शिकस्‍त इमारतीची नोंद घेणे व घरमालकांना नोटीस बजावणे, प्रभाग आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीची नागरी सहभागाद्वारे स्‍थापना करणे, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विषयक सामुग्रीची पुर्व व्‍यवस्‍था/अद्यावत ठेवणे, मोबाईल व लघुसंदेश यंत्रणा अद्यावत करणे, आपतकालीन स्थितीत शहर बसेस राखीव ठेवणे, महानगरपालिकेच्‍या अधिकारी/कर्मचारी यांचे आपातकालीन स्थितीकरिता नेमणूक करणे, पोलीस व महसुल यंत्रणेशी समन्‍वय साधुन आपातकालीन परिस्थितीचा सामना करणे, शहरामध्‍ये जनजागृती मोहीम राबविणे, नाल्‍यातील गाळ व कचरा साफ करणे, महानगरपालिकेचे दुरध्‍वनी क्रमांकाची यादी तयार करणे, दर आठवड्याला संबंधीत अधिकारी/कर्मचा-यांचे सभा घेऊन माहिती अद्यावत करणे, हॉटेल्‍स व अन्‍न विक्री स्‍थळांची तपासणी मोहीम राबविणे.

    मुख्‍य आपातकालीन कक्ष “अग्निशमन विभाग” वॉलकट कंम्‍पाऊंड यांच्‍याशी संपर्क साधण्‍याकरिता दुरध्‍वनी क्रं.०७२१-२५७६४२६ हा देण्‍यात आला आहे. हा कक्ष १ जुन,२०२२ रोजी सुरु करण्‍यात येणार असून तो ३० सप्‍टेंबर,२०२२ पर्यंत दररोज २४ तास कार्यरत राहील. नियंत्रण कक्षामध्‍ये तीन पाळी मध्‍ये कामकाज चालणार असुन प्रत्‍येक पाळीमध्‍ये एक नियंत्रण कर्मचारी, एक नियंत्रण अधिकारी व कर्मचारी कार्यान्वित असतील. त्‍यांना आवश्‍यक असणारे फावडे, पहार, घमेले, दोरखंड, घन, टिकास, कु-हाडी, बॅटरी, इत्‍यादी साहित्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. तसेच नियंत्रण कक्षासाठी वाहन चालक पुरविण्‍यात आले आहे. नागरीकांना सावधानतेचा ईशारा देण्‍याचे काम सुध्‍दा नियंत्रण कक्षा मार्फत करण्‍यात येईल.

    सर्व विभाग प्रमुखाने आपआपल्‍या विभागाची जबाबदारी अत्‍यंत काटेकोरपणे व जबाबदारीने पार पाडण्‍याची दक्षता घ्‍यावी व येणा-या पुर परिस्थितीशी मुकाबला करण्‍यात यशस्‍वी व्‍हावे असे मनपा आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी सुचित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code