Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

तथागत गौतम बु्द्ध...

    वंदन तथागत गोेतम बुद्धांना॥
    नमन करु या तवचरणांना ॥धृ॥
    गौतमांचा जन्म लुंबिनी वनात॥
    बुद्ध तत्त्वज्ञान गाजले जगात॥
    तिमिरातून जीवन प्रकाशात ॥
    शांती सागराची करु या वंदना॥१॥
    आर्यसत्य आणू या आचरणात॥
    दु:खी जन सुखमय आयुष्यात॥
    बु्द्ध उपदेश करु आत्मसात ॥
    सम्यक तत्त्वांची करु या वंदना॥२॥
    गौतमाच्या धम्माची दीक्षा देऊन॥
    बाबासाहेबांनी केले कार्य महान ॥
    धम्मचक्र प्रवर्तन मंगल दिन ॥
    तथागत बुद्धाची करू वंदना ॥३॥
    मानवतेची शिकवण गोेतमा ॥
    पंचशील विचारधन गोेतमा॥
    अष्टांगिक जीवनमार्ग गोेतमा॥
    स्मरण करुया बुद्धांच्या स्मृतींना॥४॥
    (निखारा या काव्यसंग्रहातून)
    -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
    अमरावती(महाराष्ट्र)
    भ्र.ध्व.:८०८७७४८६०९.
    Email ID: arunbundele1@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code