- कामास जायला मी, लाजत मुळीच नाही
- दामात काम देतो , वाकत मुळीच नाही
- अन्याय फार करतो, मुद्दाम कोण मजवर
- ताकीद त्यास देतो, मारत मुळीच नाही
- हातास काम द्या मज, उपकार घेत नाही
- कष्टात राबतो मी, मागत मुळीच नाही
- दुस-यास प्रेम देणे, ठाऊक या मनाला
- मी फालतू कुणावर, भाळत मुळीच नाही
- आता सुजाण झालो, सांभाळले स्वतःला
- झाला चुकून तंटा, बागत मुळीच नाही
- काळीज फाटले हे, प्रेमात कैकदा हो
- आहे तसाच जगतो, टाचत मुळीच नाही
- मी बोलतो हमेशा, निर्भीड- बोचणारे
- मज पाय चाटण्याची, आदत मुळीच नाही
- -अरुण विघ्ने