- सिध्दार्थ गौतमा!
- तुझी प्रज्ञा शिल करूणा
- या विश्र्वात विलसते
- अ,न अंहिसेच्या गोञाची
- एकमेव जननी होवून जाते
- तुझे अंहिसामूलक तत्वज्ञान
- झालेय आज विश्र्वाचा मूलमंञ
- बुध्दा तू एक समता बंधूतेचा पूजारी मैञी भावनेचा एक सुंदर मिलाफ तुझ्या वाणीतून
- दर्वळतो सारखा सारखा
- तकलादू धर्माच्या ठेकेदारांनी
- विषमता कालवून मानसाला केले एकमेका हो पारखा
- शांती करूणा मैञी
- तुझ्या वाणीचे अनमोल सार
- तुच थांबवू शकतोस आता
- कोणतेही वैश्र्विक वार
- जळी तळी काष्टी पाषाणी
- फक्त तू आणि तूच आहेस
- गिरीकंदरात,दूर्गम कडे कपारीत,रानावनात
- माञ ते निघालेत आता
- तुझा ईतिहास मिटवायला
- तुझ्या शिल्पांचे ,तुझ्या लेन्यातील सर्वागध्वस्त करायला
- ते निघालेत विद्रूपीकरण
- करायला
- पण ते आता मीटणार नाही
- तु तर केंव्हाचाच विराजमान आहेस
- विश्र्वाच्या गळ्यातील ताईत
- तु विज्ञानाचा वारकरी
- तु दुःखीतांचा तारकरी
- तुझा धम्म हे तर आहे
- मानवी दुःखावरील
- एक महान अमृत संजीवनी
- आता तर विश्र्वात तुझीच धम्मगाथा
- गाजतेय गावागावात
- अ,न हरेक विहारात
- आज जयंती तुझी गौतमा
- कोटी कोटी वंदन तुला
- एकमेव करुणा सागरा
- माझे हे वंदन पुन्हा पुन्हाss
- -शिवा प्रधान
- भोवते ले आउट
- अमरावती
- मोबा.७०५७६०५९६८
- (छाया : संग्रहित)
Contents hide