• Fri. Jun 9th, 2023

जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब

  आज 10 मे 2022 ‘जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब’ यांचा स्मृतीदिन.बघता बघता सुधाकरभाऊनां जावुन 22 वर्ष झाले. सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या दु:खद निधनानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. बंजारा समाजाला नेता आहे. परंतु समाजात नेता असणे हयात फरक आहे. मा.मनोहरभाऊ नाईक, मा.हरिभाऊ राठोड, मा.संजयभाऊ राठोड, मा.अँड.निलयभाऊ नाईक, मा.प्रदीप नाईक, मा.इंद्रनील नाईक, मा.राजेश राठोड, मा. डॉ. तुषार राठोड, आजही नेतेमंडळी आहेत. परंतु सुधाकरभाऊ सारखी दुरदुष्टी जोपासणारी व्यक्ती मिळणे दुरापास्त आहे.. सुधाकरभाऊ हे त्या अर्थाने बंजारा समाजाचे शेवटचे नेते होते. नेत्याला आवश्यक असलेले दुरदुष्टीचे सगळे गुणधर्म सुधाकरभाऊच्या ठायी ठासुन भरलेले होते. राजकारणात सरंपच,सभापती, जिल्हा परीषद अध्यक्ष, ते मुख्य मंत्री,राज्यपाल व्हावे लागल्याने सुधाकरभाऊंच्या परिपक्वपणा,संस्कारातुन, अनुभवातून, आणि ‘महानायक वसंतराव नाईकसाहेब’ यांच्या मार्गदर्शनातुन आला होता. एका भटक्या विमुक्त जातीतील माणुस अख्या महाराष्टाचे नेतृत्व करु शकतो.हे सुधाकरभाऊंनी दाखवून दिले. सत्ता गेल्या नंतरही ज्याप्रमाणे ‘महानायक वसंतराव नाईकसाहेब’ लोकांच्या अडीअडचण आणि सुखदु:खात धाऊन जात.अगदी त्याच प्रमाणे सत्तेतुन घरी परतल्यांनंतर ही ‘सुधाकरराव नाईकसाहेब’ आपल्या मतदार संघ आणि जनतेच्या सतत संपर्कात राहीले होते. हा नाईक घराण्याचा विशेष गुण आहे. त्यामुळेच लोंकाची नाळ नाईक घराण्याशी जुडलेली आहे.

  सुधाकरभाऊचे राजकारणात आगमन नाईकसाहेबामुळे झाले. नाईकसाहेब यांनी जन्म भर वकीली केली असती तर सुधाकरभाऊ कदाचित राजकारणात आले नसते. सुधाकरभाऊ राजकारणात आल्यानंतर त्यांचा रूबाबदारपणा,त्यांच्यातील कुशल प्रशासकपणाचा आणि निश्चयाचा प्रत्यय वारंवार येत गेला. मा.शरद पवार साहेंबाना क्रेदात संरक्षण मंत्री त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ध्यावी लागलेले सुधाकरराव नाईकसाहेब यांनी तमाम महाराष्टातील जनतेसमोर पडलेल्या जलक्रांती स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती करून संपूर्ण महाराष्टाला *पाणी अडवा पाणी जिरवा* हा संदेश दिला. त्यांच्या या कार्यक्रमाला सँलुट👏👏 केला पाहिजे. आपल्या मुख्यमंत्री काळात मुंबईत वाढत असलेल्या शिवसेना पक्षाचे एक नव्हे दोन नव्हे तब्बल 11 आमदार आणि मा.छगण भुजबळ सारख्या तगडया नेत्याला आणण्याचे काम तर केलेचं परंतु महाराष्टातील जवळपास 20 ते 25 जिल्हा परीषदा मध्ये गैर कांग्रेसी सत्ता होती. ती शुद्धा उलटुन सर्वच जिल्हा परिषदा काँग्रेसच्या ताब्यात घेतल्या. याची दखल क्रेंद्र सरकारला पर्यायाने काँग्रेस पार्टीला ध्यावी लागली.आणि सुधाकरराव नाईकसाहेब यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले. आणि महाराष्ट्र ला ज्या चांगल्या मुख्यमंत्री पदाची परंपरा होती. त्या यादी मध्ये सुधाकरराव नाईकसाहेब यांचे नाव अग्रकमाने समोर आले.मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या राज्याचा मुलभूत पायाचा विचार सुधाकरराव नाईकसाहेब यांनी केला. त्यामुळे यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील,शरद पवार यांच्यानंतर एक दुरदुष्टीचा नेता आणि कुशल प्रशासक अशी त्यांची प्रतिमा आपोआपच तयार झाली.

  जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष पदावरील कामाचा ताण आणि जबाबदारी ओळखुन सर्व जिल्हा परीषद अध्यक्ष यांना *राज्यमंत्री* दर्जा त्यावेळी त्यांच्यांच कल्पनेतून देण्यात आला. ऐवढेच नव्हे तर ज्या नगरपालिकाची आर्थिक स्थिती गंभीर आहे, अशा नगरपालिकांना सुद्धा एक कोटीचे अनुदान देण्याची योजना त्याच्यांच कार्यकाळात त्यांच्याच कल्पनेतून पुढे आली.ही सुधाकरराव नाईकसाहेब यांची एक अभूतपूर्व कल्पना होती. महाराष्ट्रात विविध योजना आहेत. परंतु जलसंवर्धन करण्यासाठी कोणत्याही योजनेतून पुरेसा निधी नसल्यामुळे कामे होत नाहीत. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. त्यामुळे येत्या पाच ते दहा वर्षात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. याचा अंदाज बांधून त्यांनी जलसंवर्धन खात्याची स्वतंत्र निर्मिती करून अनेक योजना वरील निधी त्याकडे वळता केला. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जलसंवर्धनाची यशस्वी कामे त्यांच्या काळात सुरू होती. नेत्याला जी दृष्टी असली पाहिजे. त्यांची झलक त्यांच्या या निर्णयात होती. असेच म्हटले पाहिजे त्यांचा फायदा निश्चितपणे आजही होतो आहे. सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या दूरदृष्टीचा आणखी एक नमुना असा होता. की बहुतेक बंजारा समाजातील वृद्ध मातापित्यांची सांभाळ करणारी मुले ऊसतोड व इतर कामासाठी बाहेर गावी जातात. त्यांना त्या काळामध्ये जगणे कठीण होते. हे हेरून त्यांनी 60 वर्षावरील वृद्ध भूमिहीनांना आर्थिक सहाय्य योजना सुरू केली. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात राहाणाऱ्या वृद्ध जोडपे यांची जगण्याची सोय झाली .संपूर्ण भारतात कुठेच वृद्ध भूमिहीनांना आर्थिक सहाय्य दिले जात नव्हते. ते सुरुवातीला महाराष्ट्रात देऊन तो सुधाकरराव नाईकसाहेब यांनी जाणीव पूर्वक दिला.

  महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्थापन करण्याची मागणी मुणालताई गोरे ,अहिल्याताई रांगणेकर, सुधा वर्दे, सुधा कुलकर्णी, डॉक्टर नीलम गोरे यांनी केल्याबरोबर अवघ्या एका आठवड्याच्या आत महिला आयोगाचा कायदा व स्वरूप याबाबतची समिती त्यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे या समितीत संस्था, काँग्रेस, जनता दल यांच्या प्रतिनिधी सोबत भाजपा, सेना यांच्या जयवंतीबेन मेहता , सुधाताई चुरी यांचाही समावेश होता. त्याबद्दल सर्वांनाच शंका होती. की एवढ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे एकमेकांशी कसे जमणार ? शेवटी सुधाकरराव नाईकसाहेब यांनी महिला आयोगाच्या निर्णयाच्या फाईलवर सही केली. महिलासाठी आयोग स्थापन करून अमलात आणले. महाराष्ट्राला सुधाकरराव नाईकसाहेब याच्यां बद्दलची आत्मीयता अधिक वाढते. याचे कारण त्यांनी लाखो रुपयाची गुंडाची गगनचुंबी इमारती ,बंगले धुळीस मिळवल्या .कशाची पर्वा न करता माफिया ,गुंड, भाई, दादा यांना त्यांनी कधीच भीक घातली नाही. एका पत्रकाराने त्यांना विचारले तुम्ही या लोकांशी काहीच घाबरत नाही .त्यावर सुधाकरराव नाईकसाहेब म्हणाले दर्‍या-कपार्‍यात राहणाऱ्या बंजारा समाजातील असून आमचा बंजारा समाज भित्रा नाही. त्यामुळे भीती वाटण्याचे काहीही कारण नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निर्मिती महाराष्ट्रात 1962 मध्ये झाली. अध्यक्ष पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊन सुधाकरराव नाईकसाहेब यांनी महाराष्ट्राची पुरोगामी भूमिका अधिक व्यापक करून कांग्रेसचे राज्य गोरगरीब जनतेपर्यंत अनेक विविध योजनेतून पोहोचवले. त्यामुळे अनेक महापालिका, नगरपालिका ,जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. याचे एकमेव कारण सुधाकरराव नाईकसाहेब होते. त्यांच्या काळात राजीव गांधी. महिलांना तीस टक्के आरक्षण दिले .या राजीव गांधी च्या निर्णयापूर्वी कोणत्याही राजकीय घरी दूरध्वनी केला तर घरातली बाई फोन उचलायची आणि सांगायची साहेब पंचायत समितीच्या बैठकीला गेले आहेत. तीस टक्केच्या निर्णयानंतर तीस घरामध्ये तरी पुरुष दूरध्वनी उचलतो. आणि सांगतो बाईसाहेब पंचायत समितीच्या मिटींगला गेल्या आहेत हा मोठा क्रांतिकारी बदल राजीव गांधी च्या विचार निर्णयातून सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या कार्यकाळात झाला. महाराष्ट्राला टंचाईमुक्त, टॅंकर मुक्त करण्याचे असेल तर जमिनीत पाणी मुरवले पाहिजे.

  सुधाकरराव नाईकसाहेब यांनी दूरदृष्टीतून घेतलेला हा एक मोठा निर्णय होता. 9 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या निमित्ताने महिला स्वातंत्र्य सैनिकाच्या सत्कार प्रसंगी सुधाकरराव नाईकसाहेब यांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या पिढीतील भगीनीच्या त्यागाला प्रतिष्ठा दिली. व महाराष्ट्रातील जनता कृतघ्न व केवळ पक्ष स्वार्थाने बरबटलेली नाही. हे दाखवून दिले .व सर्व सामान्य महिला कार्यकर्त्यांना शक्ती देण्याची त्यांची घोषणा अनेक राजकारणी नेत्यांच्या हुदयात धडकी भरून गेली. 1992 हे सुधाकराव नाईकसाहेब यांच्या लोकप्रियतेचे अत्युच्च शिखराचे वर्ष होते. महानायक वसंतराव नाईकसाहेब यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात अनेक रखडलेल्या योजनांना गती मिळाली. काही नवीन योजना सुरू करण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून त्यांनी त्यावेळी काँग्रेस पक्ष मजबूत केला. अनेक जिल्हा परिषदा काँग्रेसच्या ताब्यात आल्या. ही त्यांची फलनिष्पती होती. सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या दूरदृष्टीचा आणखी एक मोठा निर्णय जिल्हा परिषदा मजबूत करण्याचा होता. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेकडे 14 खाते समाविष्ट करून जिल्हा परिषदा भक्कम करण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलींना मोफत शिक्षण करून त्यांना एक रुपया मानधन देण्याचे सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केले. त्यामुळे शाळेत रोडवणारी मुलींच्या संख्येत अपेक्षेपेक्षा अधिक वाढ होऊ लागली .मुलींना दहावीपर्यंतचे मोफत शिक्षण त्यांनी जाहीर केले तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे,जिल्हास्तरावर निराधार महिलांसाठी आधार केंद्र अशी अनेक महिलाविषयक निर्णय त्यांनी घेतले .महानायक वसंतराव नाईक यांनी आधुनिक शेतीची सुरुवात केली होती. सुधाकरराव नाईकसाहेब यांनी त्याला लागणाऱ्या जलक्रांतीची मोठी गती दिली. महानायक वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे प्रणेते तर सुधाकरराव नाईकसाहेब हे जलक्रांतीचे नेते होत. जलपुनर्भरण हा कार्यक्रम तमाम जनतेने एक दिलाने राबविला तर येत्या वीस वर्षात जलपुनर्भरणात महाराष्ट्र देशात पुढे गेलेले राज्य असेल. आजही हरियाणातील जलसंवर्धनाची कामे मा. राजेंद्र राणा सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या जलसंवर्धन धर्तीवरच राबवीत आहेत.

  महानायक वसंतराव नाईकसाहेब यांनी महाराष्ट्राची धुरा तब्बल अकरा वर्षे सांभाळली .अनेक योजना आखल्या महाराष्ट्राला अन्नधान्यात स्वयंपूर्ण केले त्यामुळे त्यांना यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांची साथ लाभली. अवघे अकरा महीने महाराष्ट्राची धुरा ज्या तळमळीने सुधाकरराव नाईकसाहेब यांनी हाताळणी त्यामुळेच राजीव गांधी यांची जवळीक निर्माण झाली.एक कुशल नेतृत्व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे दिल्लीची नजर होती. विश्वास दिल्लीकरांनी टाकला .त्याची जपणूक सुधाकरराव नाईकसाहेब यांनी केली.म्हणून महाराष्ट्रात सर्व नेत्यात सुधाकरराव नाईकसाहेब अधिक प्रभावी ठरले होते. अनेक दिल्लीच्या वाऱ्या. पी व्ही नरसिंहरावाशीं सलगी यामुळे सुधाकरराव नाईकसाहेब राष्ट्रीय राजकारणात सामील होतात की काय ?अशी शंका महाराष्ट्रातील दिल्ली दरबारी असलेल्या नेत्याला वाटु लागली. त्यामुळेच घोळ झाला. आणि कॅबिनेट मंत्र्याच्या मीटिंगमध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाला अंतर्गत धुमसत असलेले वाद चर्चेत आले. ओढा -ओढी तणातणी झाली.सुधाकरराव नाईकसाहेब यांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले .त्यांनी औरंगाबादला जाण्यापूर्वी काही मंडळींना सांगितलेही *मला आता सर्वच फार त्रासदायक वाटायला लागलंय.* अशा आशयाचेही ते काही ठिकाणी बोलले होते. परंतु त्या मंडळींना त्यांचा पूर्ण अर्थ कळला नाही. दुसऱ्या दिवशी औरंगाबाद हुन त्यांच्या मनातील बोलले (बाँमस्फोट प्रमाणे )त्यांनी विधान केले. तेव्हा वेळ निघून गेली होती. आणि सर्वच नेतेमंडळी दिल्ली दरबारी एकत्र आली .आणि त्या नंतर काय घडू शकेल या अंदाजाप्रमाणे ठरले. त्यांनी त्याची पर्वा केली नाही.

  स्वतःचा बाणा व मते कायम प्रमाण मानली.आणि हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल पद स्वीकारले. अधिक काळ राज्य भवनात न राहता त्यांच्यातील राजकारणी माणूस राज्यभवन सोडून परत महाराष्ट्रात दाखल झाला. तोपर्यंत काँग्रेसमध्ये फूट पडून काँग्रेसचे दोन गट झाले होते .त्यांनी शरद पवार सोबत राष्ट्रवादीकडे राहण्याचा मानस केला. जर ते काँग्रेसमध्ये राहिले असते. तर कायम मुख्यमंत्री राहिले असते .पण ते कदाचित नियतीला मंजूर नव्हते. जलसंवर्धन समितीचे अध्यक्षपद त्यांना सोपविण्यात आले डॉक्टर .एन.पी.हिराणी राज्यमंत्री जलसंवर्धन खाते यांच्यासोबत स्वतःच्या प्रकृतीची परवा न करता संपूर्ण जिल्ह्यात जलसंवर्धन सभा घेऊन जलसंवर्धन कामाला गती दिली .जमिनीत पाणी मुरल्या शिवाय पाणी टंचाईवर मात करता येणार नाही. हे पटवून दिले शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मतदार संघातील जनतेच्या समस्या ते जाणून घेत .आणि लगेच संबंधित विभागाशी दूरध्वनीद्वारे बोलत असत. त्यांनी कधीही तक्रार आणणाऱ्या व्यक्तीला उद्या या असे म्हटले नाही. जे काम होते ते करायचे आणि जे होत नाही. ते होत नाही .असे स्पष्ट सांगायचे त्यामुळे त्यांच्यासमोर कधीही गर्दी जमली नाही.एवढा जनतेशी स्पष्ट बोलणारा नेता मला वाटते . महाराष्ट्रात तरी आता सापडणार नाही. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली..!

  -याडीकार पंजाबराव चव्हाण
  सुंदल निवास,कदम लेआउट श्रीरामपूर
  तालुका पुसद जिल्हा यवतमाळ
  मोबाईल नंबर 9421774372
  (छाया : संग्रहित)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *