• Sun. May 28th, 2023

कामगार दिन…

    हार्दिक शुभेच्छा । कामगार दिनी ॥
    शुभेच्छा वाणी । सर्वांनाच ॥१॥
    जीवन जगतो । स्वतः कामगार ॥
    घामाची ती धार । प्रामाणिक ॥२॥
    भारतात एक । शक्ती मुलाधार ॥
    राष्ट्राचा आधार । कामगार ॥३ ॥
    दुजाचे ते ओझे । घेई खांद्यावर ॥
    सुखाचा संसार । कामगार ॥४॥
    कामगार आहे । नाही तो गुलाम ॥
    स्वकष्टाचे दाम । अनमोल ॥५॥
    जीवनाचे दुःख । करुनिया नष्ट ॥
    शारीरिक कष्ट । रात्रंदिन ॥६॥
    सुखाचे जीवन । दुःखात शोधतो ॥
    राबतो कष्टतो । कामगार ॥७॥
    कामगार दिन । करू नये दीन ॥
    ठेवावी ही जाण । सर्वांनाच ॥८॥
    -प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
    रुक्मिणीनगर,अमरावती.
    भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९
    (Images Credit : Study Circle)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *