• Sun. Jun 11th, 2023

अरुण विघ्नेच्या कवितासंग्रहास ‘शिवाबाबा प्रतिष्ठानचा’ ‘राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

    गौरव प्रकाशन न्यूज नेटवर्क

    अमरावती (प्रतिनिधी) : कवी,समीक्षक अरुण हरीभाऊ विघ्ने यांच्या ‘मी उजेडाच्या दिशेने निघालो’ या कवितासंग्रहाला शाहदू शिवाजी वाघ शिवाबाबा प्रतिष्ठाण,पिंपळगाव (जलाल) त.येवला,जि.नाशिकतर्फे दिला जाणारा ” राज्यस्तरीय शहादू शिवाजी वाघ साहित्य पुरस्कार ” जाहीर झाला असल्याचे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय शहादू वाघ यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

    महाराष्ट्रातील कविता विभागासाठी एकूण 32 साहित्यकृती(प्रवेशीका) आल्या होत्या . परिक्षक म्हणून प्रा.डाँ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, घोडेगाव,पुणे यांनी काम या साहित्यकृतीची निवड केली आहे . या पुरस्काराचे स्वरुप, रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,मानाचे वस्त्र हे आहे . हा पुरस्कार दि.4/6/2022 रोजी पिंपळगाव(जलाल) त.येवला,जि.नाशिक येथे होणा-या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे .यासोबतच खालील साहित्यप्रकारासाठी- 1)कथासंग्रहासाठी-मातेरं-डाँ.कृष्णा भवारी,पुणे, 2)गझलसंग्रहासाठी-तुकोबाच्या कुळाचा वंश-संतोष कांबळे,मालेगाव, 3)कादंबरीसाठी -हिकमत-सुवर्णा पवार,पुणे यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

    परिक्षक म्हणून कथा-प्रा.साईनाथ पाचारणे,गझल-संजय पठाडे,कादंबरी-प्रा.दिलीप कसबे यांनी भूमीका पार पाडली आहे.अरुण विघ्ने यांच्या ‘मी उजेडाच्या दिशेने निघालो’ या कवितासंग्रहाला मिळालेला हा चवथा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आहे. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशीत आहेत. यासाठी त्यांचे प्रा. डाँ.गणेश इंगळे, डाँ.चंदू पवार, प्राचार्य भूषण रामटेके, डाँ.संजय ओरके, प्रशांत ढोले, डाँ.युवराज सोनटक्के, चित्रकार अरविंद शेलार,माधव लोखंडे, पथदर्शक परिवार, सर्व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *