Header Ads Widget

रासेयो च्या रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  स्वाती इंगळे
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  पिंपळखुटा: उत्सव समिती ,श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, व श्री संत शंकर महाराज कला महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

  शिबिराचे उद्घाटन श्री बाळासाहेब वाल्हेकर पुणे,यांचे हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री संतोष जी पोकळे पुणे , श्री राजेश मींडे पुणे, श्री शरदराव इंगळे अमरावती, व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्री संत शंकर बाबा महाराज डॉ. पंजाबराव देशमुख व श्री संत.गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

  या शिबिराला जिल्हा शासकीय रुग्णालय (इर्विन)अमरावती, येथील रक्तपेढीचे सर्व पदाधिकारी डॉ .वाघमारे यांचे मार्गदर्शन मध्ये उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये एकूण 66 राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कर्मचारी यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेश इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.दीपक बोंद्रे यांनी केले.

  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. प्रशांत जी सेलोकर, प्राचार्य डॉ. सी .यू. पाटील, उपप्राचार्य डॉ शरद नायक, प्राचार्य सुभाष मुरे, डॉ नरेश इंगळे, दीपक बोंद्रे प्रा श्रीकांत मेहरे, विजय कांब डी, प्रा निखील धोटे, श्री सुहास अप्तूरकर, प्रा राऊत, श्री पद्माकर नागपुरे ,श्री रामकृष्ण नागपुरे ,व सर्व कृषी महाविद्यालय व कला महाविद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या