Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

१ मे रोजी शांतता सदभावना लॉंग मार्च

    * वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा/शहरचे आयोजन
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : रविवार, 1 मे 2022, वेळ 5 वाजता, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करत इर्विन चौक पासून ते राजकमल चौक, जयस्तंभ चौक, महात्मा जोतिबा फुले स्मारकला अभिवादन करून चित्रा चौक येथे शांतता सदभावना लॉंग मार्चचे समारोप होईल.

    महाराष्ट्रात जे वातावरण हे दंगलीचे राजकारण, कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासाला अडथळा ठरतो यामुळे दंगली रोखणे ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. या करिता वंचित बहुजन आघाडी अमरावती व महाराष्ट्र भर वंचित आघाडी च्या वतीने सर्वांना कळकळीचे आवाहन करण्यात येते की, दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा नोटबंदी आणि लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य माणूस महागाईने व बेरोजगारीने होरपळुन गेला आहे. अशा वेळी धर्म आणि जातीच्या नावाने दंगली पेटवण्याचे षड्यंत्र काही जातीवादी शक्ती करत आहेत. वंचित बहुजन आघाडी अमरावती च्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत की आपआपल्या परिसरात आपसातला सलोखा व कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

    धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढून टाका असा कायदा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाही. धार्मिक स्थळे असो की कार्यक्रम समारंभ असो, पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन, सायंकाळी दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोंगे वापरण्यास बंदीचा आणि शांतता झोन व सामान्य परिसरामध्ये विशिष्ट 'डेसिबल' तीव्रतेचा नियम पाळून लाऊडस्पीकर वापरण्यास, भोंगा अथवा लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी आहे. चक्क भोंगे काढूनच टाकने हा कायदेशीर वा समजदारीचा मार्ग होणार नाही. कोणत्याही धार्मिक स्थळी, उत्सव समारंभात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी अशी आमची भूमिका आहे. राजकीय स्वार्थापोटी धार्मिक दंगली पेटवणा-यांच्या षडयंत्राला बळी पडू नका. अफवा पसरवू नका. कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अमरावती चे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील. कुठेही काहीही अनुचित प्रकार दिसून आल्यास आमच्या स्थानीक पदाधिकाऱ्यांना संपर्क साधा. आपल्या विभागात शांतता व कायदा-सुव्यवस्था टिकून ठेवण्यामध्ये आम्ही आपल्या सोबत राहून पूर्ण सहकार्य करू असे वंचित बहुजन आघाडी अमरावती शहरचे शहर महासचिव प्रमोद राऊत यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code