Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

‘मनरेगा’तून ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची अनेक कामे पूर्णत्वास - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेकडो कामांना चालना देण्यात आली असून, अनेक कामे पूर्ण झाली आहेत. याद्वारे रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उत्तम मुलभूत सुविधांची निर्मिती होत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज टाकरखेडा संभू येथे केले.

    ‘मनरेगा’तून पेव्हिंग ब्लॉकसह काँक्रिट रस्ता, काँक्रिट नाली आदी विविध कामांचे भूमिपूजन, तसेच लोकार्पण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते टाकरखेडा संभू, देवरी, जळका आदी विविध गावांत झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, रस्ते, पूल, नाल्या, इमारती आदी विविध पायाभूत सुविधांची कामे जिल्ह्यात सर्वदूर होत आहेत. अनेक कामांची मनरेगाशी सांगड घातल्याने रोजगारनिर्मिती साध्य होत आहे. अमरावती व भातकुली तालुक्यात ‘मनरेगा’तून २ कोटी ४७ लक्ष ५१ हजार ७५८ रुपये निधीतून कुशल कामे, तसेच ३९ लक्ष ७७ हजार ५८८ निधीतून अकुशल कामे अशा एकूण २ कोटी ८७ लक्ष २९ हजार ३४६ रुपये निधीतून रोजगार निर्मितीबरोबरच अनेक विकासकामे पूर्णत्वास जात आहेत. त्याशिवाय, जिल्ह्यात ठिकठिकाणी अशी अनेक कामे होत आहेत. यापुढेही मनरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामांना चालना देण्याचे नियोजन आहे. प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावे, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

    अमरावती व भातकुली तालुक्यातील कामांमध्ये टाकरखेडा येथे आशिष गणोरकर ते त्रिदिप पाटील ते बाबुराव भागवत यांच्या घराकडे जाणारा पेव्हिंग ब्लॉकसह रस्ता, प्रशांत ठाकरे ते सतीश बांडबुचे यांच्याकडे घराकडे जाणारा रस्ता, नाली काँक्रिट बांधकाम, अजाबराव मेश्राम ते शे. हारूण यांच्या घराकडे जाणारा रस्ता, वॉर्ड क्र. १ मध्ये पेव्हिंग ब्लॉकसह काँक्रिट रस्ता, रामा येथे महादेव मंदिर ते ग्रामपंचायत काँक्रिट रस्ता, ओटेश्वरी महादेव मंदिर ते सीतामाय मंदिर रस्ता, श्री. जुनघरे ते श्री. ढोके यांच्या घराकडे जाणारा रस्ता, समाजमंदिर ते श्री. काळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता, जळका येथे श्री. मकेश्वर ते श्री. विधे यांच्या घराकडे जाणारा रस्ता, तलाव रस्ता, श्री. तायडे, तसेच श्री. सलाम आणि श्री. वैराळे ते श्री. भोरे यांच्या घराकडे जाणारा रस्ता, देवरी येथे श्री. बोरकर ते श्री. गावंडे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता, श्री. अटाळकर ते तीनमजली ते श्री. गावंडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता, तीनमजली ते श्री. जुनघरे, तसेच श्री. चव्हाण ते श्री. चिंचखेडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता, तसेच दर्याबाद येथील विविध कामांचा समावेश आहे.

    त्याचप्रमाणे, धामोरी येथे हनुमान मंदिरापासून काँक्रिट रस्ता, श्री. ढोके ते श्री. साबळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता, प्राथमिक शाळा ते श्री. बोंडाईत यांच्या घराकडे जाणारा रस्ता, खोलापूर येथे पोलीस ठाणे ते अ. बशीर यांच्या घराकडे जाणारा काँक्रिट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, साजिद बेग ते लड्डू बेग ते संगम चौकाकडे जाणारा रस्ता, अनिस खाँसाहेब ते नजिरभाई पानवाले यांच्या घराकडे जाणारा रस्ता, अ. वाजिब ते तमीजभाई यांच्या घराकडे जाणारा रस्ता, कामुंजा येथे श्री. वडुकार ते श्री. व-हाडे, श्री. पाखरे ते श्री. पंडित, तसेच श्री. नागदिवे यांच्या घराजवळील रस्ता, श्री. डहाके ते श्री. तलवारे यांच्या घराकडे जाणारा रस्ता, श्री. सावरकर काका यांच्या घरापर्यंत जाणा-या रस्ता आदी कामांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code