Header Ads Widget

नमक हलाल

कोणी झालेत भडवे
कोणी झालेत दलाल
कोटी कोटी हप्ते खाऊ
झाले नमक हलाल !!

नेते,अधिकारी भ्रष्ट
व्यापारी झालेत चोर
सत्तेचा हा खेळ चाले
सारे चोरावर मोर !!

गोड स्वप्नात रंगले
दंगलेत भ्रष्टाचारी
ठाई ठाई फुत्कारती
व्यभिचारी दुराचारी !!

स्वार्था साठी झाला आता
राजकारणाचा धंदा
कुणी निंदा किंवा वंदा
चाले स्वहिताचा धंदा !!

आमदार खासदार
झालेत आता कुबेर
मंत्री अधिकाऱ्या घरी
निघे सोनं, नोटांचा केर !!

भ्रष्टाचार महागाई
झालोत आम्ही बेजार
नमक हलाला पाई
झालोत आम्ही लाचार !!

साता समुद्री बुडवा
गलिच्छ राजकारण
ऊठा मर्द मावळ्यांनो
आणू या समाजकारण !!
       
- वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या