अमरावती (प्रतिनिधी) : "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीय जनतेच्या जीवनात खूप मोठा क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी रात्रंदिवस सतत परिश्रम घेतले.अन्यायग्रस्त समाजासाठी त्यांनी केलेले कार्य खूप अनमोल आहे.आपल्या धारदार लेखणीतून बाबासाहेबांनी भारतीय जनतेला न्याय मिळवून दिला..स्वतंत्र भारतासाठी संविधान देऊन भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा मजबूत पाया घातला म्हणून आज भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र बनले आहे .संविधानामुळे भारतीय समाज सर्व क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक व वक्ते प्रा. अरुण बुंदेले यांनी केले.
स्थानिक दलित, आदिवासी, बहुजन व वंचित,असंघटित कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे उपेक्षित समाज महासंघ व कै.मैनाबाई बाबाराजी बुंदेले प्रतिष्ठान च्या वतीने विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त उपेक्षित समाज महासंघाच्या कार्यालयात संपन्न झालेल्या प्रबोधनपर कार्यक्रमात विचार व्यक्त करीत हाेते.महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड अध्यक्षस्थानी तर कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे उद्घाटक होते. प्रमुख मार्गदर्शक व वक्ते प्रा.अरुण बुंदेले होते तर प्रमुख अतिथी श्री मनोहर बारसे, प्राचार्य टी.एफ. दहिवाडे,डॉ. मिलिंद नाखले,बाबा मांडवकर, सचिन पाटील,रवींद्र कांबळे,महेंद्र भालेकर, विशुद्धानंद जवंजाळ,सौ.चंदा बारसे होते.
अध्यक्ष,उद्घाटक, प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.प्रमुख अतिथींनी डॉ .आंबेडकर यांच्या विविधांगी क्रांतिकारी कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी उपेक्षित समाज महासंघाचे कार्याध्यक्ष श्रीकृष्णदास माहोरे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी "सद्य स्थितीतील विषमताधिष्टीत व्यवस्था परिवर्तनासाठी फुले- शाहू- आंबेडकरांची स्थिरावलेली पुरोगामी चळवळ गतिशील करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. जाती जातीत व धर्मा धर्मात तेढ निर्माण करून वैमनस्याला खतपाणी घालणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. भारतातील बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांनी संघटितरित्या लढा देणे ही खरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरेल, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य टी. एफ.दहिवाडे व आभार प्रदर्शन गोविंद फसाटे यांनी केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या