Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

आज राजकमल चौकात चुलीवरील ‘चाय पे चर्चा’ आंदोलन

* नागरिकांनी सहभागी व्हावे प्रदीप बाजड यांचे आवाहन. अमरावती : महागाईच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने चुलीवर चाय पे चर्चा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आज सोमवार ४ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत राजकमल चौकात चुलीवर चाय मांडून चाय पे गरम चर्चा करण्याकरिता नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रदीप बाजड यांनी केले आहे. केंद्रातील भाजप जनतेला मोठ-मोठी खोटी आश्वासन देऊन बहुमताच्या सत्तेत आलेलं. भाजप सरकार सातत्याने सिलेंडर, पेट्रोल, डीझेल व जीवनाश्यक वस्तूंचे भाव दररोज वाढवून गरीब व सर्वसामान्य लोकांचे जीवन त्रस्त करून जगने कठीण केले असा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. जनतेला दिलेले आश्वासन सत्तेच्या नशेत विसरून झोपेचे सोंग घेतलेल्या भाजपला वेगळ्या पद्धतीने जागे करणे अत्यावश्यक झाल्याचे मत शिवसेनेच्या वतीने व्यक्त केले आहे. याचा निषेध नोंदविण्याकरिता व पंतप्रधान यांना त्यांच्या अनमोल स्मृतीची आठवण करून देण्यासाठी त्यांचा आवडता कार्यक्रम महागाईवर चाय पे चर्चाचे आयोजन सोमवार ४ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत केले आहे. प्रचंड वाढलेल्या महागाईवर आपल्या तीव्र भावना मांडण्याकरिता सर्व जनतेनी राजकमल चौक येथे “चाय पे गरम चर्चा” करण्याकरिता सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, नगरसेवक व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code