Recent in Technology

Advertisement

Breaking News

भाऊसाहेब...

  वंदन करितो भाऊसाहेबांना।
  नमन माझे तव चरणांना ॥धृ॥
  तिमिरात बघा सूर्य उगवला।
  विद्यारुपी गंगेचा उगम झाला॥
  झोपडीतला या तम उजाडला।
  आचरण करू या तव तत्त्वांना॥१॥
  दशदिशा या करुनी तेजोमय।
  सतकर्मांनी दिशा या गंधमय।
  जीवन जगले भाऊ कष्टमय।
  भाऊंनी दिली दिशा हीनदिनांना॥२॥
  भाऊसाहेबांची गाऊ आज किर्ती।
  अजरामर झाली प्रेरक मूर्ती ॥
  जगण्याची दिली बहुजन स्फूर्ती।
  स्मरण करूया भाऊंच्या स्मृतींना॥३॥
  "निखारा" या काव्यसंग्रहातून
  -प्रा अरुण बाबारावजी बुंदेले,
  रुक्मिणीनगर,अमरावती.
  ८०८७७४८६०९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code