गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती, (प्रतिनिधी): जिल्ह्यातील पायाभूत सुविधा व विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व मूलभूत सुविधाअंतर्गत विविध विकासकामांत अंतोरा येथे ग्रामसडक योजनेत २ कोटी २० लक्ष निधीतून अंतोरा ते ब्राम्हणवाडा रस्त्यावर पुलाचे बांधकामाचे, शेवती येथे पाच लक्ष रुपये निधीतून हनुमान मंदिराजवळ सभामंडपाचे भूमीपूजन व रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यातील रस्ते, पूल, इमारती आदी अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. कामांची गरज लक्षात घेऊन नव्या विकासकामांना चालना देण्यात येत आहे. विकासकामांसाठी आवश्यक निधीची उणीव भासू देणार नाही. प्रशासनाने विहित मुदतीत कामे पूर्ण करावीत व ती गुणवत्तापूर्ण असावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावेळी कार्यकर्ते, अधिकारी, नागरिक आदी उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या