Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

पळस !

  रखरखता अग्नी अंगावर पांघरून
  पळस एकटाच फुलतो
  कधी रानात तर कधी रस्त्याच्या दुतर्फा
  भर उन्हाळ्यात.
  येणा-या-जाणा-यांना ,पशू-पक्ष्यांना,
  चिडी-मुंग्याना, भुंग्यांना मोहीत करीत असतो, विनामूल्य क्षुधा शमवित.
  एरव्ही मात्र सर्व ऋतूत तो निर्वंश भासतो
  पण फुलण्यासाठी वसंताची वाट बघतो
  त्याची रक्तवर्णी फुलंही आमच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी तत्पर असतात सदैव.
  आणि फाल्गुन मासात सर्वांना
  मनमुराद चैतन्य बहाल करीत
  स्वतः मात्र झेलत असतो
  उघडा-बोडखा उन्हाचे प्रहार बिनबोभाट.
  काही माणसाचंही अशीच तपतात,जळतात
  पण आम्ही लोक हव्यासापोटी त्याचे हात-पाय धडापासून वेगळे करतो निर्दयीपणे,
  त्याला अधू करून सोडून देतो पाण्याविना निराधार तडफडत जगण्यासाठी.
  झाड,माणूस बणण्याचा जीव ओतून प्रयत्न करीत असतं,
  आपलं सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी पणाला लावित असतं
  पण माणसातील माणूस मात्र बणताना दिसत नाही
  ते सर्वानांच सारखंच प्रेम देतं
  माणसाचं मात्र तसं नसतं
  याचंच दुःख कायम मनात सलतं
  समजलं तरी उमजत नसतं
  येथेच तर खरं पाणी मुरत असतं.
  मला झाड नाही तर किमान
  माणसातील माणूस तरी होता आलं पाहिजे
  -अरुण विघ्ने
  ("पिंपळ व्हायचंय मला " या कवितासंग्रहामधून)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code