Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

क्रांतीबा....

    ज्योत पेटवून ज्ञानाची
    सारा भारत प्रकाशमान केला.
    स्त्री दास्य गुलामगिरीवर
    ज्ञानाचा आसूड ओढला.
    कर्मठ विषमतेच्या भटगिरीला
    अखरेचा इशारा दिला.
    ज्ञानाची महत्ती ओळखून
    नवा माणूस तयार केला.
    धर्मग्रंथाच्या बनावटगिरीची
    पोलखोल उगडी केला.
    अज्ञानी बांधवाच्या आयुष्यात
    माणुसकिची सूर्यपौर्णिमा आनला.
    शेतकऱ्यांच्या दुःखावरती
    माय होऊनी फुंकर घातला.
    शिक्षणाच्या झिरपत्या सिंध्दाताला
    आक्रमकतेने विरोध केला.
    अंधरूढीला धिक्कारुन
    समतामूलक समाज निर्माण केला.
    सावित्रीमाईच्या हस्तामध्ये
    नवक्रांतीची मशाल दिला.
    क्रांतीबा तू सकलजनाचा
    विद्रोहाची ज्वाला झाला.
    बिनमेंदूच्या विकृतेवर
    सत्यशोधकाचा वार केला.
    -संदीप गायकवाड
    नागपूर
    ९६३७३५७४००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code