शिक्षणाची महती सांगून गेले
कष्ट, यातना सोसत,सावरत
स्वत: शिकून महान बनले !!
दिन दुबळ्यांचा कैवारी
वीर सामाजिक क्रांतीचे
जीव तोडून, ज्योतिबाने
व्दार उघडले शिक्षणाचे!!
शेतकऱ्यांसाठी लढले अहोरात्र
काढली शाळा मुलींसाठी
सावित्री बाईस तयार केले
त्याही खपल्या समाजासाठी!!
विधवा पुनर्विवाहासाठी झटले
शिक्षणाची जागृतता दाखविली
शिक्षा साठी अभियान चालविला
शुद्रां साठी विद्यालय स्थापन केली!!
जिद्द, चिकाटी,मेहनत,निष्ठा,
उच्च निच भेदभाव नष्ट केला
मुंबईत महात्मा पदवी मिळाली
स्त्री शिक्षणाचा झेंडा रोवला!!
स्वातंत्र्य सैनिक म्हणून केला सहयोग
देशप्रेमींसाठी ठरले महान जननायक
लढाई जिंकली स्वातंत्रतेची
सामाजिक क्रांतीचे झाले ते जनक!!
- हर्षा वाघमारे
नागपूर ✍️
0 टिप्पण्या